No edit permissions for मराठी

TEXT 32

ye tv etad abhyasūyanto
nānutiṣṭhanti me matam
sarva-jñāna-vimūḍhāṁs tān
viddhi naṣṭān acetasaḥ

ये-जे; तु-परंतु; एतत्-या; अभ्यसूयन्त:- द्वेषाने; -नाही; अनुतिष्ठन्ति-नियमितपणे करतात; मे-माझ्या; मतम्-आदेशांचे; सर्व-ज्ञान-सर्व प्रकारच्या ज्ञानामध्ये; विमूढान्- पूर्णपणे मूर्ख झालेले; तान्-त्यांना; विद्धि-चांगल्या प्रकारे; नष्टान्-सर्वत: नष्ट झालेले; अचेतस:- कृष्णभावनारहित.

परंतु जे द्वेषभावनेने या आदेशांची उपेक्षा करतात आणि त्यांचे पालन करीत नाहीत त्यांना ज्ञानशून्य, मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात ते भ्रष्ट झालेले आहेत असे समजावे.

तात्पर्य: कृष्णभावनाभावित न होण्याचा दोष या श्लोकात स्पष्टपणे सांगितला आहे. ज्याप्रमाणे उच्च शासकीय अधिकाऱ्याचा आज्ञेचा भंग केल्यास शिक्षा होते त्याचप्रमाणे पुरुषोत्तम श्रीभगवान यांची अवज्ञा केल्यास निश्तितच शिक्षा होते. अवज्ञा करणारा व्यक्ती कितीही महान असला तरी तो हृदयशून्य असल्यामुळे त्याला स्वत:च्या आत्म्याविषयी तसेच, परब्रह्म, परमात्मा आणि भगवान यांच्याविषयी सुद्धा अज्ञान असते म्हणून त्यांच्यासाठी जीवनसिद्धीची मुळीच आशा नसते.

« Previous Next »