No edit permissions for मराठी

TEXT 38

dhūmenāvriyate vahnir
yathādarśo malena ca
yatholbenāvṛto garbhas
tathā tenedam āvṛtam

धूमेन-धराने; आव्रियते-आच्छादिला जातो; वह्नि:- अग्नी; यथा- ज्याप्रमाणे; आदर्श:- आरसा; मलेन-धुळीने; -सुद्धा; यथा-ज्याप्रमाणे; उल्बेन-वारेने; आवृत्त:- आच्छादिला जातो; गर्भ:- गर्भ; तथा-त्याप्रमाणे; तेन-त्या कामाने; इदम्-हा; आवृतम्-आच्छादिला आहे.

ज्याप्रमाणे धूराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टिला जातो त्याचप्रमाणे जीव, या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो.

तात्पर्य: जीवावर तीन प्रकारची आच्छादने आहेत, ज्यामुळे त्याची विशुद्ध चेतना धूसर होते. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये धूर, आरशावर धूळ आणि गर्भाशयामध्ये गर्भ असतो त्याचप्रमाणे जीवावरील आवरणे म्हणजे कामाचीची विविध रुपे आहेत. जेव्हा कामाची तुलना धुराशी करण्यात येते तेवहा समजावे की जीवरुपी अग्नीची थोडीशी जाणीव होते. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर, जेव्हा जीव आपली कृष्णभावना अल्पशा प्रमाणात प्रकट करतो तेव्हा त्याची तुलना धुराने आच्छादित अग्नीशी करता येते. ज्या ठिकाणी धूर असतो त्या ठिकाणी निश्चितच अग्नी असला तरी प्रारंभिक अवस्थेमध्ये अग्नी उघडपणे प्रकट होत नाही. ही अवस्था म्हणजे कृष्णभावनेतील प्रारंभावस्थेप्रमाणे आहे. आरशावरील धूळ, मनरुपी आरशावरील अनेक आध्यात्मिक पद्धतींद्वारे, स्वच्छता करण्याची प्रक्रिया दर्शविते. यासाठी सर्वोत्तम पद्धती म्हणजे पवित्र हरिनामाचे कीर्तन होय. वारेने आच्छादिलेल्या गर्भाच्या उदाहरणावरून असाहाय्य स्थिती दर्शविण्यात आली आहे. कारण गर्भाशातील मूल इतके असाहाय्य असते की, त्याला हालचालही करता येत नाही. जीवनाच्या या स्थितीची तुलना वृक्षांशी करता येते. वृक्षसुद्धा जीवच आहेत; पण ते अत्यंत कामप्रवृत्त असल्यामुळे त्यांना जीवनाच्या अशा स्थितीत ठेवण्यात येते की, ते जवळजवळ चेतनाशून्यच असतात. आच्छादित आरशाची तुलना पशुपक्ष्यांशी करण्यात आली आहे आणि धुराने आच्छादित अग्नीची तुलना मानवाशी करण्यात आली आहे. मनुष्यजीवनामध्ये आत्मा थोड्या प्रमाणात कृष्णभावनेशी पुनर्जागृती करू शकतो आणि जर त्याने अधिक प्रगती केली तर मनुष्यजीवनातच आध्यात्मिक जीवनरुपी अग्नी प्रज्वलित करता येतो. अग्नीवरील धूर व्यवस्थितपणे हाताळल्यास अग्नी प्रज्वलित करता येतो. म्हणून जीवासाठी भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून मुक्त होण्यासाठी मनुष्यजीवन ही एक नामी संधीच आहे. मनुष्यजीवनात योग्य मार्गदर्शनाखाली कृष्णभावनेच्या अनुशीलनाद्वारे मनुष्य आपला शत्रू काम याच्यावर विजय प्राप्त करू शकतो.

« Previous Next »