No edit permissions for मराठी

TEXT 39

āvṛtaṁ jñānam etena
jñānino nitya-vairiṇā
kāma-rūpeṇa kaunteya
duṣpūreṇānalena ca

आवृतम्-झाकलेला; ज्ञानम्-शुद्ध चेतना; एतेन-या; ज्ञानिन:-ज्ञानी व्यक्तीचा; नित्य-वैरिणा-नित्य शत्रूद्वारे; काम-रूपेण-काम रूपामध्ये; कौन्तेय- हे कुंतीपुत्रा; दुष्पूरेण-कधीही संतुष्ट न होणारा; अनलेन-अग्नीद्वारे; - सुद्धा

याप्रमाणे ज्ञानी जीवाची शुद्ध चेतना त्याच्या कामरुपी नित्य शत्रूद्वारा आच्छादिली जाते. काम कधीच संतुष्ट होत नाही आणि तो अग्नीप्रमाणे जळत असतो.

तात्पर्य: मनुस्मृतीत म्हटले आहे की, ज्याप्रमाणे इंधनाच्या निरंतर पुरवठ्याने अग्नी विझला जात नाही, त्याचप्रमाणे अमर्यादित इंद्रियतृप्ती केली तरी काम तृप्त होऊ शकत नाही. भौतिक जगतामध्ये सर्व क्रियांचा केंद्रबिंदू मैथुन हाच आहे आणि म्हणून भौतिक जगताला ‘मैथुन्य आगार’ किंवा संभोग जीवनाची बेडी असे म्हटले जाते. एका सामान्य कारागृहात गुन्हेगारांना गजाआड ठेवण्यात येत, त्याचप्रमाणे भगवंतांच्या नियमांची अवज्ञा करणाऱ्या गुन्हेगारांना मैथुन जीवनाची बेडी घातली जाते. इंद्रियतृप्तीवर आधारित भौतिक संस्कृतीची प्रगती ही जीवात्म्याच्या भौतिक अस्तित्वाची कालमर्यादा वाढविण्यास कारणीभूत ठरते म्हणून हा काम म्हणजे अज्ञानाचे प्रतीक आहे आणि या कामामुळेच जीवाला भौतिक जगतात राहणे भाग पडते. जेव्हा मनुष्य इंद्रियतृप्तीचा भोग घेतो तेव्हा त्याला थोड्याफार सुखाची अनुभूती होत असेल; पण तथाकथित सुखाचा तो अनुभव हा इंद्रियभोग करणाऱ्याचा परम शत्रू आहे.

« Previous Next »