No edit permissions for मराठी

TEXT 7

yas tv indriyāṇi manasā
niyamyārabhate ’rjuna
karmendriyaiḥ karma-yogam
asaktaḥ sa viśiṣyate

:- जो कोणी; तु-परंतु; इन्द्रियाणि-इंद्रिये; मनसा-मनाद्वारे; नियम्य-नियमित करून; आरभते - प्रारंभ करतो; अर्जुन-हे अर्जुन; कर्म-इन्द्रियै:-कर्मेइंद्रियांद्वार; कर्म-योगम्- भक्ती; असक्त:- आसक्तीरहित; स:-तो; विशिष्यते-अधिक श्रेष्ठ आहे.

याउलट जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियाना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा (कृष्णभावनाभावित) प्रारंभ करीत असेल तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे.

तात्पर्य: स्वैर अविचारी जीवन आणि इंद्रियतृप्तीसाठी ढोंगी अध्यात्मवादी होण्यापेक्षा मनुष्याने स्वत:चा व्यवसाय करीतच जीवनाच्या ध्येयाची प्राप्ती करीत राहणे हे किती तरी पटीने उत्तम आहे. जीवनाचे वास्तविक ध्येय म्हणजे भवबंधनातून मुक्त होऊन भगवद्धामात प्रवेश करणे हे होय. मुख्य स्वार्थ-गति किंवा आत्म-कल्याण श्रीविष्णूंची प्राप्ती करण्यातच आहे. संपूर्ण वर्णाश्रम पद्धतीची व्यवस्थाच अशा रीतीने करण्यात आली आहे की, ज्यायोगे आपण श्रीविष्णूंची प्राप्ती करू शकू. एखादा गृहस्थाश्रमीही कृष्णभावनेमध्ये नियमित सेवा करून विष्णूंची प्राप्ती करू शकतो. आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्य संयमित जीवन व्यतीत करून आसक्ती न ठेवता आपला व्यवसाय करू शेकतो आणि आध्यात्मिक प्रगतीही करू शकतो. जो प्रामाणिक मनुष्य या पद्धतीचे पालन करतो, तो निष्पाप लोकांना फसविण्यासाठी दिखाऊ अध्यात्मवादाचा स्वीकार करणाऱ्या पाखंडी व्यक्तीपेक्षा अत्यंत चांगल्या स्थितीत आहे. केवळ उदरनिर्वाहाकरिता ध्यान करणाऱ्या भोंदू योगीपेक्षा रस्त्यावर झाडू मारणारा प्रामाणिक झाडूवाला किती तरी पटीने श्रेष्ठ आहे.

« Previous Next »