No edit permissions for मराठी

TEXT 8

niyataṁ kuru karma tvaṁ
karma jyāyo hy akarmaṇaḥ
śarīra-yātrāpi ca te
na prasidhyed akarmaṇaḥ

नियतम्- नियत; कुरु- कर्म-कर्म; त्वम्-तू; कर्म-कर्म; ज्याय:- चांगले, श्रेष्ठ; हि-निश्चितच; अकर्मण:-कर्म न करण्यापेक्षा; शरीर - शारीरिक; यात्रा- पालन किंवा निर्वाह; अपि- जरी; -सुद्धा; ते-तुझी; -कधीच नाही; प्रसिद्धयेत्-सिद्ध होणार; अकर्मण:-कर्मावाचून.

तुझे नियत कर्म तू कर, कारण नियत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कर्म केल्यावाचून मनुष्य आपल्या शरीराचाही निर्वाह करू शकत नाही.

तात्पर्य: असे पुष्कळ भोंदू योगी आहेत जे स्वत: उच्चकुलीन असल्याचे दर्शवितात. आध्यात्मिक जीवनातील प्रगतीकरिता आपण सर्वस्वाचा त्याग केल्याचा दिखावा करणारे अनेक मोठमोठे व्यावसायिकही आहेत. अर्जुनानेही मिथ्याचारी व्हावे अशी श्रीकृष्णांची इच्छा नव्हती. याउलट श्रीकृष्णांची इच्छा होती की, अर्जुनाने क्षत्रियांसाठी सांगण्यात आलेले नियम कर्म करावे. अर्जुन हा गृहस्थ आणि सेनापती होता म्हणून त्याने गृहस्थ व सेनापती राहूनच क्षत्रियांसाठी सांगणयात आलेल्या धार्मिक कर्तव्यांचे पालन करणे हे त्याच्यासाठी हितकारक होते. अशा प्रकारचे कर्तव्यपालन भौतिकवादी मनुष्याचे हृदय क्रमश: शुद्ध करून त्याची भौतिक दोषातून मुक्तता करते. उदरनिर्वाहाकरिता तथाकथित त्याग करण्याला भगवंतांनी तसेच कोणत्या शास्त्रानेही कधीच मान्यता दिली नाही. सरतेशेवटी प्रत्येकाला आत्मा आणि शरीर एकत्र ठेवण्यासाठी काही तरी कर्म करावेच लागते. भौतिक प्रवृत्तींपासून शुद्धीकरण झाल्यावाचून लहरीखातर कर्मत्याग करणे उचित नाही. भौतिक जगात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रभुत्व गाजविणयाची मलिन प्रवृत्ती निश्तिच असते किंवा दुसऱ्या शब्दात संागावयाचे झाल्यास इंद्रियतृप्ती करण्याची मलिन प्रवृत्ती ही असतेच. अशा दूषित प्रवृत्ती नाहीशा करणे आवश्यक आहे. नियत कर्मांद्वारे असे केल्यावाचून मनुष्याने कर्मसंन्यास घेऊन दुसऱ्याच्या जीवावर राहून तथाकथित अध्यात्मवादी होण्याचा कधीही प्रयत्न करू नये.

« Previous Next »