TEXT 23
gata-saṅgasya muktasya
jñānāvasthita-cetasaḥ
yajñāyācarataḥ karma
samagraṁ pravilīyate
गत-सङ्गस्य-प्राकृतिक गुणांमध्ये आसक्त नसलेला; मुक्तस्य-मुक्त झालेल्या; ज्ञान-अवस्थित-ज्ञानामध्ये स्थित झालेला; चेतस:- ज्याचे ज्ञान; यज्ञाय-यज्ञाप्रीत्यर्थ (कृष्ण); आचरत:- आचरण करणारा; कर्म-कर्म; समग्रम्-संपूर्ण; प्रविलीयते-पूर्णपणे विलीन होते.
जो मनुष्य प्राकृतिक गुणांपासून अनासक्त आहे आणि पूर्णपणे दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे त्याचे कर्म पूर्णपणे दिव्यत्व प्राप्त करते.
तात्पर्य: पूर्णपणे कृष्णभावनाभावित झाल्यामुळे मनुष्ये सर्व द्वंद्वातून मुक्त होतो आणि याप्रमाणे तो प्राकृतिक गुणांच्या दोषांपासूनही मुक्त होतो. श्रीकृष्णांशी संबंधित आपल्या स्वरुपस्थितीचे त्याला ज्ञान असल्यामुळे तो मुक्त होऊ शकतो आणि म्हणून त्याचे मन कृष्णभावनेपासून कधीही विचलित होऊ शकत नाही. यामुळे तो जे जे करतोते आदिविष्णू म्हणजेच श्रीकृष्णांप्रीत्यर्थ करतो. म्हणून त्याचे कर्म यज्ञाप्रमाणेच आहे, कारण यज्ञाचा उद्देश हा परम पुरुष श्रीविष्णू, श्रीकृष्णांना संतुष्ट करणे हाच असतो. अशा कर्मांमुळे प्राप्त होणारी कर्मे निश्चितच दिव्यत्वामध्ये विलीन होतात व त्यामुळे कर्मफलांचे भौतिक परिणाम भोगावे लागत नाहीत.