No edit permissions for मराठी

TEXT 32

evaṁ bahu-vidhā yajñā
vitatā brahmaṇo mukhe
karma-jān viddhi tān sarvān
evaṁ jñātvā vimokṣyase

एवम्-याप्रमाणे; बहु-विधा:- नाना प्रकारचे; यज्ञा:-यज्ञ; वितता:- विस्तारलेले आहेत; ब्रह्मण:-वेदांचे; मुख-मुखाद्वारे; कर्म-जान्-कर्मजन्य; विद्धि-तू जाण; तान्-त्यांना; सर्वान्-सर्व; एवम्-याप्रमाणे; ज्ञात्वा-जाणून; विमोक्ष्यसे-तू मुक्त होशील.

हे सर्व विविध प्रकारचे यज्ञ वेदसंमत आहेत आणि ते सर्व विविध प्रकारच्या कर्मापासून उत्पन्न झाले आहेत. याप्रमाणे त्यांना जाणल्यावर तू मुक्त होशील.

तात्पर्य: वर वर्णन केल्याप्रमाणे वेदांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे सर्वजण कर्म करणाऱ्यांना अनुरुप असे विविध प्रकारचे यज्ञ सांगण्यात आले आहेत. देहात्मबुद्धीमध्ये पूर्णपणे रत झाल्यामुळे या यज्ञाचे आयोजन अशा रीतीने करण्यात आले आहे की, ज्यामुळे मनुष्य आपले शरीर, मन किंवा बुद्धीद्वारे यज्ञ करू शकतो. परंतु या सर्वांचा अंतिम उद्देश मनुष्याला शरीरातून मुक्त करणे हाच आहे. याला भगवंतांनी स्वत: याठिकाणी पुष्टी दिली आहे.

« Previous Next »