No edit permissions for मराठी

TEXT 24

yo ’ntaḥ-sukho ’ntar-ārāmas
tathāntar-jyotir eva yaḥ
sa yogī brahma-nirvāṇaṁ
brahma-bhūto ’dhigacchati

:-जो; अन्त:-सुख:- अंतरी सुखी असणारा; अन्त:- आराम:- अंतरात रमणारा; तथा-तसेच;अन्त:-ज्योति:- अंतरातच ध्येय असणारा; एव-निश्चित; य:-जो; स:-तो; योगी-योगी;ब्रह्म-निर्वाणम्-ब्रह्मामध्ये मुक्त झालेला; ब्रह्म-भूत:- आत्मसाक्षात्कारी; अधिगच्छति-प्राप्त करतो.

ज्याचे सुख अंत:करणात आहे, जो अंतरात सक्रिय आहे आणि अंतरातच आनंद अनुभवत असतो आणि ज्याचे ध्येय अंतरातच आहे तो वास्तविकपणे परिपूर्ण योगी आहे. तो ब्रह्मामध्ये मुक्त होता आणि शेवटी ब्रह्माची प्राप्ती करतो.

तात्पर्य: जोपर्यंत मनुषय अंत:करणात सुखाचा अनुभव घेऊ शकत नाही, तोपर्यंत तो वरकरणी सुख प्राप्त करून देणाऱ्या बाह्य क्रियांपासून कसा निवृत्त होऊ शकेल? मुक्त मनुष्य हा प्रत्यक्ष अनुभवाद्वारेच सुखाचा आनंद घेतो. म्हणून तो कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसू शकतो आणि जीवनाच्या क्रियांचा अंतरातच उपभोग घेऊ शकतो. असा मुक्त मनुष्य बाह्य भौतिक सुखाची मुळीच अपेक्षा करीत नाही. या अवस्थेलाच ब्रह्मभूत अवस्था म्हटले जाते. या अवस्थेची प्राप्ती झाल्यावर स्वगृही म्हणजेच भगवद्धामात परत जाता येते.

« Previous Next »