No edit permissions for मराठी

TEXT 24

sa niścayena yoktavyo
yogo ’nirviṇṇa-cetasā
saṅkalpa-prabhavān kāmāṁs
tyaktvā sarvān aśeṣataḥ

manasaivendriya-grāmaṁ
viniyamya samantataḥ

 :- त्या; निश्चयेन- दृढनिश्‍चयाने; योक्तव्य:- अभ्यास केला पाहिजे; योग-योगाचा; अनिर्विण्ण-चेतसा-विचलित न होता; सङ्कल्प-मानसिक तर्क; प्रभवान्-उत्पन्न; कामान्-भौतिक कामना; त्यक्त्वा-त्याग करुन; सर्वान्-सर्व; अशेषत:-पूर्णपणे; मनसा-मनाद्वारे; एव-निश्‍चितपणे; इन्द्रिय -ग्रामम्-संपूर्ण इंद्रिय समूह; विनियम्य-नियमित करून; समान्तत:- सव बाजूंनी.

मनुष्याने दृढ निश्‍चियाने आणि श्रद्धेने योगाभ्यासामध्ये युक्त झाले पाहिजे आणि त्याने योगमार्गातून विचलित होऊ नये. मानसिक तर्कामुळे उत्पन्न झालेल्या सर्व भौतिक कामनांचा पूर्ण त्याग करून मनाद्वारे सर्व इंद्रियांना सर्व बाजूंनी संयमित केले पाहिजे.

तात्पर्य: योगाच्या अभ्यासकाने दृढनिश्‍चयी असावे आणि विचलित न होता धैर्याने अभ्यास करावा. मनुष्याला अंतिम यशप्राप्तीची  शाश्‍वती असली पाहिजे आणि यशप्राप्तीसाठी जरी विलंब लागला तरी त्याने निरुत्साही न होता दृढनिश्‍चयी होऊन योगाभ्यास केला पाहिजे. खडतर अभ्यासकाला नक्कीच यश प्राप्त होते. भक्तियोगाबद्दल रूप गोस्वामी सांगतात की:

उत्साहान्निश्चयाद्धैर्यात्तत्तत्कर्मप्रवर्तनात्।
संगत्यागात्सतो वृत्ते: षड्भिर्भक्ति: प्रसिद्धयति।

     ‘‘अतं: करणपूर्वक उत्साह, निश्‍चय आणि धैर्याने भक्तांच्या सत्संगामध्ये विहित कार्यांचे पालन करून व पूर्णपणे सत्वगुणाने युक्त होऊन कार्य केल्यामुळे मनुष्य यशस्वीपणे भक्तियोगाचे अनुसरण करू शकतो.’’ (उपदेशामृत 3)

     धैर्याच्या बाबतीत सांगावयाचे झाल्यास, समुद्राच्या लाटांमध्ये अंडे हरविलेल्या टिटवीचे उदाहरण मनुष्याने अनुसरले पाहिजे. एका टिटवीने समुद्रकिनार्‍यावर आपली अंडी घातली होती; परंतु महासागराने आपल्या लाटांबरोबर ती अंडी वाहून नेली. हे पाहून टिटवी अत्यंत क्षुब्ध झाली आणि तिने सागराला आपली अंडी परत देण्यास सांगितले. समुद्राने तिच्या विनंतीकडे लक्षही दिले नाही. म्हणून तिने समुद्र आटविण्याचा निश्‍चय केला. तिने आपल्या लहानशा चोचीने पाणी आणण्यास सुरुवात केली आणि तिच्या अशक्यप्राय: धैर्याकडे पाहून सर्वजण तिचा उपहास करू लागले. तिच्या धैर्याची वार्ता सर्वत्र पसरली आणि शेवटी भगवान  श्रीविष्णूंचे वाहन, महाकाय गरुडाच्या कानी ही गोष्ट गेली. त्याला आपल्या बहिणीबद्दल करूणा वाटली आणि म्हणून तो टिटविला पाहण्यास आला. लहानशा टिटवीचे धैर्य पाहून गरुड तिच्यावर प्रसन्न झाला आणि त्याने टिटवीला मदत करण्याचे आश्‍वासन दिले. याप्रमाणे गरुडाने तात्काळ समुद्राला टिटवीची अंडी परत देण्यास सांगितले, अन्यथा तो स्वत: समुद्राला आटविण्याचे, टिटवीचे काम पत्करील, यामुळे समुद्र भयभीत झाला आणि त्याने टिटवीची अंडी परत केली. अशा प्रकारे गरुडाच्या कृपेने टिटवी अतिशय आनंदी झाली.

     त्याचप्रमाणे योगाभ्यास, विशेषकरून कृष्णभावनायुक्त भक्तियोग म्हणजे एक कठीण गोष्ट असल्याप्रमाणे वाटेल, परंतु जो कोणी दृढतेने नियमांचे पालन करतो, त्याला भगवंत नक्कीच साहाय्य करतात, कारण जे स्वत:ला मदत करतात त्यांना भगवंत मदत करतात.

« Previous Next »