No edit permissions for मराठी

TEXT 25

śanaiḥ śanair uparamed
buddhyā dhṛti-gṛhītayā
ātma-saṁsthaṁ manaḥ kṛtvā
na kiñcid api cintayet

 
शनै:-हळूहळू; शनै:- क्रमाक्रमाने; उपरमेत्-मनुष्याने आवरले पाहिजे; बुद्ध्या-बुद्धीने; धृति-गृहीतया-दृढ विश्‍वासाने युक्त; आत्म-संस्थम्-समाधीमध्ये; मन:- मन; कृत्वा-करून; -नाही; किञ्चित्-इतर काहीही; अपि-सुद्धा; चिन्तयेत्-विचार करावा.

हळूहळू, क्रमश: दृढविश्‍वासाने युक्त झालेल्या बुद्धीद्वारे समाधीमध्ये मनुष्याने स्थित झाले पाहिजे आणि याप्रमाणे मन केवळ आत्म्यावर स्थिर केले पाहिजे व इतर कशाचाही विचार करू नये.

तात्पर्य: योग्य विश्‍वास आणि बुद्धीद्वारे मनुष्याने क्रमश: इंदियांच्या क्रियांचा लय केला पाहिजे. यालाच प्रत्याहार असे म्हणतात. दृढविश्‍वास, ध्यान आणि इंद्रियनिग्रह यांद्वारे मन संयमित करून मनाला समाधीस्थ करावे. त्या वेळी देहात्मबुद्धीमुळे प्रभावित होण्याची शक्यता राहत नाही. दुसर्‍या शब्दांत सांगावयाचे तर, भौतिक शरीर असेपर्यंत जरी मनुष्याचा भौतिक प्रकृतीशी संपर्क असला तरी त्याने इंद्रियतृप्ती करण्याचा विचार करू नये. परमात्म्याच्या आनंदाव्यतिरिक्त इतर कोणत्याही आनंदाचा त्याने विचार करू नये. कृष्णभावनेच्या प्रत्यक्ष आचरणाने ही स्थिती सहजपणे प्राप्त होते.

« Previous Next »