No edit permissions for मराठी

TEXT 43

tatra taṁ buddhi-saṁyogaṁ
labhate paurva-dehikam
yatate ca tato bhūyaḥ
saṁsiddhau kuru-nandana

तत्र-तेथे; तम्-त्या; बुद्धि-संयोगम्-चेतनेची पुनर्जागृती; लभते-प्राप्त होते; पौर्व-देहिकम-पूर्वदेहापासून; यतते-तो प्रयत्न करतो; -सुद्धा; ततः-त्यानंतर; भूयः-पुन्हा; संसिद्धौ-सिद्धीसाठी; कुरु-नन्दन-हे कुरुनंदन.

हे कुरुनंदन! असा जन्म मिळाल्यावर तो आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेचे पुनरुज्जीवन करतो आणि परिपूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतो.

तात्पर्यः चांगल्या ब्राह्मणांच्या घरी जन्म घेतलेला भरत राजा म्हणजे, आपल्या पूर्वजन्मातील दिव्य चेतनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी थोर कुटुंबामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्तीचे चांगले उदाहरण आहे. भरत राजा हा पृथ्वीचा सम्राट होता आणि त्याच्या वेळेपासून देवदेवतांमध्ये ही भूमी भारतवर्ष या नावाने विख्यात आहे. त्यापूर्वी या भूमीला इलावृतवर्ष म्हटले जात होते. तरुण वयातच सम्राटाने आध्यात्मिक पूर्णता प्राप्त करण्यासाठी निवृत्ती स्वीकारली; परंतु तो सिद्धी प्राप्त करण्यात अपयशी झाला. नंतर त्याने पुढच्या जन्मात सदाचारी ब्राह्मणाच्या कुटुंबामध्ये जन्म घेतला आणि तो कोणाशीच बोलत नसल्यामुळे आणि नेहमी एकांतवासातच राहात असल्याकारणाने जडभरत नावाने ओळखला जाऊ लागला आणि त्यानंतर राजा रहूगणाला तो परमयोगी असल्याचे कळाले. त्याच्या जीवनावरून कळून येते की, आध्यात्मिक सिद्धीच्या प्राप्तीसाठी केलेले प्रयत्न किंवा योगाभ्यास कधीच व्यर्थ होत नाही. भगवंतांच्या कृपेने योगी मनुष्याला कृष्णभावनेमध्ये पूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी वारंवार संधी मिळते.

« Previous Next »