No edit permissions for मराठी

TEXT 6

bandhur ātmātmanas tasya
yenātmaivātmanā jitaḥ
anātmanas tu śatrutve
vartetātmaiva śatru-vat

बन्धु:-मित्र; आत्मा-मन; आत्मन:-जीवाचे; तस्य-त्याचे; येन-ज्याने; आत्मा-मन; एव-निश्‍चितच; आत्मना-जीवांद्वारे; जित:- जिंकलेला; अनात्मन:- जो मनाला संयमित करण्यामध्ये अपयशी झाला आहे; तु-परंतु; शत्रुत्वे-शत्रुत्वामुळे; वर्तेत-राहतो; आत्मा एव-तेच मन; शत्रु-वत्-शत्रूप्रमाणे.

ज्याने मनाला जिंकले आहे, त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे; परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे त्याच्यासाठी त्याचे मन हे परम शत्रू असते.

तात्पर्य: मनाला संयमित करणे हा अष्टांगयोगाच्या अभ्यासाचा उद्देश असतो ज्यामुळे मानवी जीवनाची ध्येयप्राप्ती करण्यासाठी मन हे मित्र होऊ शकेल. जोपर्यंत मन संयमित होत नाही तोपर्यंत योग (देखाव्याकरिता) म्हणजे केवळ कालापव्यय आहे. जो मनुष्य आपल्या मनाला संयमित करू शकत नाही तो नेहमी सर्वांत मोठ्या शत्रूबरोबरच राहात असतो आणि याप्रमाणे त्याचे जवीन आणि जीवनाचा उद्देश निष्फळ होतो. वरिष्ठांच्या आज्ञांचे पालन करणे ही जीवाची स्वरुपस्थिती आहे. जोपर्यंत मनुष्याचे मन अविजित शत्रू राहते तोपर्यंत त्याला काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादींच्या आदेशंचे पालन करावे लागते. परंतु मन जेव्हा जिंकले जाते तेव्हा मनुष्य  स्वेच्छेने, परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित असणाऱ्यापुरुषोत्तम श्रीभगवान यांच्या आज्ञांचे पालन करण्याचे मान्य करतो. वास्तविक योगाभ्यास म्हणजे हृदयस्थित परमात्म्याशी संबंध प्रस्थापित करणे आणि त्यानंतर त्याच्या आज्ञांचे पालन करणे होय. ज्याने कृष्णभावनेचा प्रत्यक्षपणे स्वीकार केला आहे, त्याच्या बाबतीत भगवंतांच्या आज्ञांना शरण जाणे आपोआपच सिद्ध होते.

« Previous Next »