No edit permissions for मराठी

TEXT 5

uddhared ātmanātmānaṁ
nātmānam avasādayet
ātmaiva hy ātmano bandhur
ātmaiva ripur ātmanaḥ

 उद्धरेत्-मनुष्याने उद्धार केला पाहिजे; आत्मना-मनाद्वारे; आत्मानम्-बद्धजीव; -कधीच नाही; आत्मानाम्-बद्धजीव; अवसादयेत्-अधोगती होऊ देणे; आत्मा-मन; एव-निश्‍चितच; हि-खरोखर; आत्मन:- बद्ध जीवाचे; बन्धु:-मित्र; आत्मा-मन; एव-निश्‍चितच; रिप:- शत्रु; आत्मन:- बद्ध जीवाचे.

मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वत:ची अधोगती होऊ न देतात, स्वत:चा उद्धार केला पाहिजे. मन हे बद्ध जीवाचा मित्र तसेच शत्रूही आहे.

तात्पर्य: विविध परिस्थितीनुसार ‘आत्मा’ शब्दाचा अर्थ शरीर, मन व आत्मा असाही होतो. योगपद्धतीमध्ये विशेषकरून बद्ध जीव आणि मन हे महत्त्वपूर्ण असतात. योगाभ्यासाचा केंद्रबिंदू हा मन असल्यामुळे या ठिकाणी ‘आत्मा’ हा शब्द मनाचा निर्देश करतो. योगपद्धतीचा हेतू हा मन संयमित करणे आणि इंद्रियविषयावरील आसक्तीपासून मन काढून घेणे हा आहे. या ठिकाणी निक्षून सांगण्यात आले आहे की, मनाला अशा प्रकारे प्रशिक्षित केले पाहिजे की, जेणेकरून ते बद्ध जीवाचा अज्ञानाच्या दलदलीतून उद्धार करू शकेल. भौतिक जीवनात मनुष्य मन आणि इंद्रियांच्या आधीन होतो. वस्तुत: मनामुळेच विशुद्ध जीव भौतिक अस्तित्वात गुरफटून जातो. मनाचा मिथ्या अहंकाराशी संबंध येतो आणि हा मिथ्या अहंकाराच भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याची इच्छा करतो. म्हणून मनाला अशा प्रकारे प्रशिक्षित केले पाहिजे की, जेणेकरून ते भौतिक प्रकृतीच्या झगमगाटाने आकर्षित होणार नाही आणि याप्रकारे बद्ध जीवाचे रक्षण होऊ शकेल. इंद्रियविषयांद्वारे आकर्षित होऊन मनुष्याने स्वत:च अधोगती होऊ देऊ नये. मनुष्य जितक्या प्रमाणात इंद्रियविषयांद्वारे तो आकर्षिला जातो तितक्या प्रमाणात तो भौतिक अस्तित्वामतध्ये गुंतत जातो. यातून सुटण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे, मनाला सतत कृष्णभावनेमध्ये युक्त करणे होय. हि या शब्दाला, या मुद्यावर जोर देण्यासाठीच उपयोग करण्यात आला आहे, म्हणजे मनुष्याने हे केलेच पाहिजे.असेही सांगण्यात येते की:

मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयो:।
बन्धाय विषयासंगो मुक्त्यै निर्विषयं मन:॥

     ‘‘मनुष्यासाठी मन हे बंधनाचे तसेच मुक्तीचेही कारण आहे.इंद्रियविषयामध्ये संलग्न झालेले मन हे बंधनास कारणीभूत असते आणि इंद्रियविषयापासून अनासक्त झालेले मन हे मुक्तीस कारणीभूत होते.’’ (अमृतबिंदू उपनिषद 2) म्हणून जे मन निरंतर कृष्णभावनेमध्ये संलग्न असते ते परम मुक्तीस कारणीभूत असते.

« Previous Next »