No edit permissions for मराठी

TEXT 26

śukla-kṛṣṇe gatī hy ete
jagataḥ śāśvate mate
ekayā yāty anāvṛttim
anyayāvartate punaḥ

शुक्ल—प्रकाश; कृष्णे-आणि अंधकार; गती-जाण्याचे मार्ग, हि-निश्चितच; एते-हे दोन; जगतः-भौतिक जगताच्या; शाश्वते-वेदांच्या; मते-मतानुसार; एकया-एकाने; याति-जातो; अनावृक्तिम्-पुन्हा न परतण्यासाठी; अन्यया-दुस-याने; आवर्तते-परत येतो; पुन:-पुन्हा.

वैदिक मतानुसार, प्रकाशमय आणि अंधकारमय असे या जगतातून प्रयाण करण्याचे दोन मार्ग आहेत. जेव्हा मनुष्य प्रकाशमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येत नाही; परंतु जेव्हा अंधकारमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येतो.

तात्पर्य: आचार्य बलदेव विद्याभूषण यांनी छांदोग्य उपनिषदातून (५.१०-३-५) प्रयाण मार्गाचे आणि परत येण्याचे हेच वर्णन उद्धृत केले आहे. जे सकाम कर्मी आणि दर्शनिक तर्कवादी आहेत ते अनादी कालापासून अविरतपणाने ये-जा करीत आहेत. वास्तविकपणे ते श्रीकृष्णांना शरण जात नसल्यामुळे त्यांना अंतिम मोक्षप्राप्ती होत नाही.

« Previous Next »