No edit permissions for मराठी

TEXT 7

tasmāt sarveṣu kāleṣu
mām anusmara yudhya ca
mayy arpita-mano-buddhir
mām evaiṣyasy asaṁśayaḥ

तस्मात्-म्हणून; सर्वेषु-सर्व; कालेषु-काळी; माम्-माझे; अनुस्मर-स्मरण करीत रहा; युध्य-युद्ध कर; -सुद्धा; मयि-माझ्या ठायी; अर्पित-शरणागत होऊन किंवा अर्पण करून; मनः-मन; बुद्धिः-बुद्धी; माम्—मला; एव-निश्चितपणे; एष्यसि-तू प्राप्त होशील; असंशयः-निःसंदेह.

म्हणून हे अर्जुना! तू सदैव माझे (कृष्ण या रूपाचे) स्मरण केले पाहिजे आणि त्याचबरोबर तुला आपल्या युद्धरूपी स्वधर्माचेही आचरण केले पाहिजे. तुझी कर्मे मला अर्पण केल्याने आणि तुझ्या मनाला आणि बुद्धीला माझ्या ठायी स्थिर केल्याने, तुला निःसंदेह माझी प्राप्ती होईल.

तात्पर्य: भगवंतांनी अर्जुनाला केलेला हा उपदेश सांसारिक कर्मे करण्यात गढून गेलेल्या सर्व लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मनुष्याने आपल्या विहित कर्माचा किंवा उद्योगांचा त्याग केला पाहिजे असे भगवंत सांगत नाहीत. आपले विहित कर्म करीत असतानाच मनुष्य हरेकृष्ण महामंत्राचा जप करीत श्रीकृष्णांचे स्मरण करू शकतो. यामुळे त्याची भौतिक विकारातून मुक्तता होऊ शकते आणि त्याचे मन व बुद्धी श्रीकृष्णांच्या ठायी स्थिर होऊ शकते. श्रीकृष्णांच्या नामाचे कीर्तन केल्याने मनुष्याला सर्वोच्च लोकांची, कृष्णलोकाची निःसंदेह प्राप्ती होते.

« Previous Next »