No edit permissions for मराठी

TEXT 27

yat karoṣi yad aśnāsi
yaj juhoṣi dadāsi yat
yat tapasyasi kaunteya
tat kuruṣva mad-arpaṇam

यत्-जे; करोषि-तू करतोस; यत्-जे; अश्नासि-तू खातोस; यत्-जे; जुहोषि-तू अर्पण करतोस; ददासि-तू दान देतोस; यत्-जे; यत्-जे; तपस्यसि-तू तपस्या करतोस; कौन्तेय हे कौंतेय; तत्-ते; कुरुष्व-कर; मत्-मला; अर्पणम्-अर्पण.

हे कौंतेया! तू जे जे कर्म करतोस, जे जे खातोस, जे जे हवन करतोस किंवा दान देतोस आणि तू जे तप करतोस, ते सर्व तू मला अर्पण कर

तात्पर्य: याप्रमाणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे की, त्याने जीवनाला असे वळण दिले पाहिजे, जेणेकरून त्याला कोणत्याही परिस्थितीत श्रीकृष्णांचे विस्मरण होणार नाही. सर्वांना प्राणधारणार्थ कर्म करावेच लागते आणि या श्लोकात भगवंत सांगतात की, मनुष्याने सर्व कर्मे त्यांच्या प्रीत्यर्थ करावी. सर्वांना जगण्याकरिता काही तरी खावेच लागते. म्हणून मनुष्याने कृष्णप्रसाद खावा. कोणत्याही सुसंस्कृत मनुष्याला काही तरी धार्मिक कर्मकांड करावेच लागतात. म्हणून श्रीकृष्ण सांगतात की, 'हे सर्व माझ्यासाठी कर.' यालाच अचन असे म्हटले जाते. प्रत्येकामध्ये दान देण्याची प्रवृत्ती असते म्हणून श्रीकृष्ण सांगतात की, 'हे दान मला दे." याचा अर्थ असा आहे की, अतिरिक्त धनसंपत्तीचा कृष्णभावनामृताच्या आंदोलनाचा प्रसार करण्यासाठी विनियोग केला पाहिजे. सद्यस्थितीमध्ये लोकांचा ध्यान प्रक्रियांकडे अधिक कल दिसून येतो; पण ही प्रक्रिया या युगासाठी अव्यवहार्य आहे. तथापि, आपल्या जपमाळेवर हरेकृष्ण मंत्राचा जप करीत दिवसातील चौविस तास, श्रीकृष्णांचे ध्यान करण्याचा जो मनुष्य प्रयत्न करतो तो निश्चितच गीतेच्या सहाव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे सर्वश्रेष्ठ योगी आहे.

« Previous Next »