TEXT 45
yadi mām apratīkāram
aśastraṁ śastra-pāṇayaḥ
dhārtarāṣṭrā raṇe hanyus
tan me kṣema-taraṁ bhavet
यदि-जरी; माम्-मी; अप्रतीकारम्-प्रतिकार न करता; अशस्त्रम्-पूर्ण शस्त्रसज्ज न होता; शस्त्र-पाणय:- शस्त्रधारी; धार्तराष्ट्रा:- धृतराष्टाचे पुत्र; रणे-युद्धभूमीवर; हन्यु:- मारतील; तत्-ते; मे-मला; क्षेम-तरम्-अधिक चांगले, योग्य; भवेत्-होईल.
शस्त्रधारी धृतराष्ट्रपुत्रांनी माझ्यासारख्या नि:शस्त्र आणि प्रतिकार न करणार्यांची हत्या केली तर तेच माझ्यासाठी अधिक चांगले होईल.
तात्पर्य: युद्धाला तयार नसलेल्या व नि:शस्त्र असलेल्या शत्रूवर हल्ला करू नये हा क्षत्रियांच्या युदधतत्त्वांमधील एक नियम आहे. परंतु अशा विचित्र परिस्थितीमध्ये सुद्धा शत्रूने हल्ला केला, तरीही अर्जुनाने प्रतिकार न करण्याचा निर्णय घेतला. विरुद्ध पक्ष युद्ध करण्यासाठी किती उत्सुक आहे याचा विचारही अर्जुनाने केला नाही. भगवंतांचा महान भक्त असल्यामुळे तो सहृदय होता व त्यामुळेच त्याच्यामध्ये ही लक्षणे दिसून येत होती.