No edit permissions for मराठी

TEXT 46

sañjaya uvāca
evam uktvārjunaḥ saṅkhye
rathopastha upāviśat
visṛjya sa-śaraṁ cāpaṁ
śoka-saṁvigna-mānasaḥ

सञ्जय: उवाच-संजय म्हणाला; एवम्-याप्रमाणे; उक्त्वा-बोलून; अर्जुन:-अर्जुन; सङ्ख्ये-रणभूमीवर; रथ-रथात; उपस्थे- आसनावर; उपविशत्-खाली बसला; विसृज्य-बाजूला ठेवून; -शरम्-बाणांसहित; चापम्-धनुष्य; शोक-शोकाने; संविग्न-पीडित, उद्विग्न, शोकाकुल; मानस:- मनामध्ये

संजय म्हणाला: रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने आपले धनुष्यबाण बाजूला टाकले आणि मनामध्ये अत्यंत शोकाकुल होऊन रथामध्ये खाली बसला.

तात्पर्य: आपल्या शत्रूच्या व्यूहरचनेचे अवलोकन करताना अर्जुन रथामध्ये उभा होता, पण तो शेाकाने इतका व्याकूळ झाला की, आपले धनुष्यबाण बाजूला ठेवून तो पुन्हा खाली बसला. भगवद्भक्तीमधील अशी दयाशील आणि सहृदय व्यक्ती आत्मज्ञान प्राप्त करण्यास सर्व प्रकारे योग्य आहे.

या प्रकारे भगवद्गीतेच्या ‘अर्जुनविषादयोग’ या पहिल्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.

« Previous