No edit permissions for मराठी

TEXT 20

aham ātmā guḍākeśa
sarva-bhūtāśaya-sthitaḥ
aham ādiś ca madhyaṁ ca
bhūtānām anta eva ca

अहम्-मी; आत्मा-आत्मा; गुडाकेश-हे अर्जुन; सर्व-भूत-सर्व जीवांचा; आशय-स्थित:- हृदयामध्ये स्थित असणारा; अहम्-मी; आदिः-आदि किंवा मूळ; -सुद्धा; मध्यम्-मध्य; -सुद्धा; भूतानाम्-सर्व जीवांचा; अन्तः-अंत; एव-निश्चितच; -आणि.

हे अर्जुना! सर्व जीवांच्या अंतर्यामी स्थित असणारा परमात्मा मी आहे. मीच सर्व जीवांचा आदि, मध्य आणि अंत आहे.

तात्पर्य: या श्लोकामध्ये अर्जुनाला गुडाकेश असे संबोधण्यात आले आहे. ज्याने निद्रारूपी अंधकारावर विजय प्राप्त केला आहे त्याला गुडाकेश असे म्हणतात. अज्ञानरुपी अंधकारात निद्रिस्त असलेले लोक भौतिक आणि आध्यात्मिक जगतात भगवंत विविध प्रकारे स्वत:ला कसे प्रकट करतात हे जाणू शकत नाहीत. अशा रीतीने श्रीकृष्णांनी अर्जुनाला गुडाकेश असे संबोधणे फार महत्वपूर्ण आहे, कारण अर्जुन हा अंधकाराच्या अतीत असल्यामुळे भगवंत त्याला आपल्या विविध ऐश्वर्यांचे वर्णन करण्याचे मान्य करतात.

          श्रीकृष्ण सर्वप्रथम अर्जुनाला सांगतात की ते आपल्या प्राथमिक विस्तारित रूपांद्वारे संपूर्ण सृष्टीच्या अंतरी असणारा आत्मा आहेत. भौतिक सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी भगवंत आपल्या प्राथमिक विस्तारित रूपाद्वारे पुरुषावतार धारण करतात आणि त्या पुरुषावतारापासून सर्वांचा उद्गम होतो. म्हणून ते महत्तत्वाचा आत्मा आहेत. समग्र भौतिक शक्तीही सृष्टीच्या उत्पत्तीस कारणीभूत नसते, तर वस्तुतः महाविष्णू हे महत्तत्वात, अर्थात, भौतिक शक्तीमध्ये प्रवेश करतात. म्हणून ते आत्मा आहेत. जेव्हा महाविष्णू सृष्ट ब्रह्मांडामध्ये प्रवेश करतात तेव्हा ते पुन्हा प्रत्येक जीवामध्ये स्वतःला परमात्मारूपामध्ये प्रकट करतात. आपल्याला अनुभव आहे की, जीव शरीरामध्ये आध्यात्मिक स्फुलिंग उपस्थित असल्यामुळे ते सजीव राहते. आध्यात्मिक स्फुलिंगाच्या उपस्थितीविना शरीराचा विकासही शक्य नाही. त्याचप्रमाणे भौतिक सृष्टीमध्ये जोपर्यंत परमात्मा श्रीकृष्ण प्रवेश करीत नाहीत तोपर्यंत भौतिक सृष्टी विकसित होऊ शकत नाही सुबल उपनिषदात। सांगिल्याप्रमाणे प्रकृत्यादि सर्वभूतान्तर्यामी सर्वशेषी च नारायण:- भगवंत, परमात्मारूपाने सर्व ब्रह्मांडांमध्ये उपस्थित आहेत.

          भगवंतांच्या तीन पुरुषावतारांचे वर्णन श्रीमद्‌भागवतात करण्यात आले आहे. सात्वत तन्त्रामध्येही त्यांचे वर्णन करण्यात आले आहे. विष्णौस्तुत्रीणि रूपाणि पुरुषाख्यान्यथा विदुःया भौतिक सृष्टीमध्ये कारणोदकशायी विष्णू, गभौंदकशायी विष्णू आणि क्षीरोदकशायी विष्णू या तीन रूपांमध्ये भगवंत प्रकट होतात. महाविष्णू किंवा कारणोदकशायी विष्णूंचे वर्णन ब्रह्मसंहितेत (५.४७) करण्यात आले आहे, यः कारणार्णवजले भजति स्म योगनिद्राम- सर्व कारणांचे कारण, भगवान श्रीकृष्ण कारणोदक सागरामध्ये महाविष्णू रूपामध्ये पहुडलेले असतात. म्हणून भगवंत हेच या सृष्टीचे आदी, मध्य आणि अंत आहेत.

« Previous Next »