No edit permissions for मराठी

TEXT 19

śrī-bhagavān uvāca
hanta te kathayiṣyāmi
divyā hy ātma-vibhūtayaḥ
prādhānyataḥ kuru-śreṣṭha
nāsty anto vistarasya me

श्री-भगवान् उवाच-श्रीभगवान म्हणाले; हन्त-होय; ते—तुला; कथयिष्यामि-मी सांगेन; दिव्याः-दिव्य; हि—निश्चितच; आत्म-विभूतयः-माझी ऐश्वर्ये; प्राधान्यतः—प्रधान किंवा प्रमुख, कुरु-श्रेष्ठ-हे कुरुश्रेष्ठा;न अस्ति—नाही, अन्तः—सीमा; विस्तरस्य—विस्ताराला, मे-माझ्या.

श्रीभगवान म्हणाले, ठीक आहे, मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तींबद्दल सांगेन; परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांचेच मी कथन करीन, कारण हे अर्जुना! माझे ऐश्वर्य अनंत आहे.

तात्पर्य : श्रीकृष्णांचा महिमा आणि त्यांचे ऐश्वर्य यांचे आकलन होणे शक्य नाही. जीवाची इंद्रिये ही अपूर्ण आहेत आणि म्हणून जीव हे श्रीकृष्णांना समग्ररूपाने समजू शकत नाही. तरीही भक्त श्रीकृष्णांना जाणण्याचा प्रयत्न करतात; परंतु ते असा विचार करीत नाहीत की, विशिष्ट काळी किंवा विशिष्ट जीवनावस्थेत आपल्याला श्रीकृष्णांचे पूर्ण ज्ञान होईल उलट कृष्णकथा ही इतकी मधुर आहे की, ती भक्ताला अमृततुल्य वाटते. म्हणून भक्तांना त्यातून आनंदप्राप्ती होते. श्रीकृष्णांचे ऐश्वर्य आणि त्यांच्या विविध शक्तींची चर्चा केल्याने शुद्ध भक्ताला दिव्यानंद प्राप्त होत असतो. म्हणून त्यांची चर्चा करण्यात आणि त्यांच्याबद्दल श्रवण करण्यास ते सदैव उत्सुक असतात. श्रीकृष्ण जाणतात की, जीव आपल्या ऐश्वर्यांची पूर्ण माहिती जाणू शकत नाहीत म्हणून ते आपल्या निरनिराळ्या शक्तींच्या केवळ प्रमुख अभिव्यक्तींचे वर्णन करण्याचे मान्य करतात. प्राधान्यतः (प्रमुख) हा शब्द महत्त्वपूर्ण आहे, कारण भगवंतांच्या विभूती अनंत असल्यामुळे आपण भगवंतांच्या प्रमुख विभूतींपैकी केवळ थोड्याच विभूती जाणू शकतो. त्या सर्व जाणणे शक्य नाही. या श्लोकात विभूती या शब्दाद्वारे दर्शविल्याप्रमाणे भगवंत ज्या ऐश्वर्याद्वारे संपूर्ण सृष्टीचे नियंत्रण करतात त्या ऐश्वर्याचा बोध होतो. अमरकोश शब्दकोषानुसार विभूती म्हणजे विलक्षण ऐश्वर्य होय.

          निर्विशेषवादी किंवा सर्वेश्वरवादी, भगवंतांचे विलक्षण ऐश्वर्य तसेच दिव्य शक्तींची अभिव्यक्तीही जाणू शकत नाही. आध्यात्मिक तसेच भौतिक अशा दोन्ही जगतात भगवंतांच्या शक्ती विविध अभिव्यक्तींच्या रूपाने विखुरलेल्या आहेत. साधारण मनुष्य कोणत्या विभूतींचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो याचे वर्णन आता श्रीकृष्ण करीत आहेत. अशा रीतीने त्यांच्या वैविध्यपूर्ण शक्तीच्या अंशाचे हे वर्णन आहे.

« Previous Next »