No edit permissions for मराठी

TEXT 13

tatraika-sthaṁ jagat kṛtsnaṁ
pravibhaktam anekadhā
apaśyad deva-devasya
śarīre pāṇḍavas tadā

तत्र-तेथे; एक-स्थम्-एकाच ठिकाणी; जगत्-विराट जगत; कृत्स्नम्-संपूर्ण; प्रविभक्तम्‌- विभाजित; अनेकधा-अनेकविध; अपश्यत्-पाहू शकला; देव-देवस्य-भगवंतांच्या; शरीरे-विश्वरूपामध्ये; पाण्डव:-अर्जुन; तदा-त्या वेळी.

त्या वेळी अर्जुनाने भगवंतांच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली, परंतु अनंत ग्रहांमध्ये विभागलेली ब्रह्मांडाची विस्तृत रूपे पाहिली.

तात्पर्य: या श्लोकामधील तत्र हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. हा शब्द दर्शवितो की, जेव्हा अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघेही रथावर आरूढ होते तेव्हाच अर्जुनाने विश्वरूप पाहिले. युद्धभूमीवरील इतरांना हे विश्वरूप पाहता आले नाही, कारण भगवान श्रीकृष्णांनी केवळ अर्जुनालाच दिव्य दृष्टी प्रदान केली होती. अर्जुनाने श्रीकृष्णांच्या शरीरामध्ये अनंत ग्रहलोक पाहिले. वैदिक शास्त्रांवरून आपल्याला कळून येते की, सृष्टीमध्ये अनेक ब्रह्मांडे आणि अनेक गृहलोक आहेत. त्यांपैकी काही भूमीपासून, काही सुवर्णापासून तर काही रत्नांपासून बनलेले असतात. त्यापैकी काही महाकाय आणि काही लहान असतात. आपल्या रथावर बसून अर्जुनाने हे सर्व पाहिले, परंतु अर्जुन आणि श्रीकृष्ण या दोघांमध्ये काय चालले आहे हे कोणीच जाणू शकले नाही.

« Previous Next »