No edit permissions for मराठी

TEXT 19

anādi-madhyāntam ananta-vīryam
ananta-bāhuṁ śaśi-sūrya-netram
paśyāmi tvāṁ dīpta-hutāśa-vaktraṁ
sva-tejasā viśvam idaṁ tapantam

अनादि-अनादी, मध्य-मध्य; अन्तम्-किंवा अंत, अनन्त-अनंत, वीर्यम्-महिमा, अनन्त-अनंत; बाहुम्-भुजा; शशि-चंद्र; सूर्य-आणि सूर्य; नेत्रम्-नेत्र; पश्यामि-मी पाहतो; त्वाम्-तुम्हाला; दीप्त-प्रज्वलित; हुताश-वक्त्रम्-तुमच्या मुखातून अग्नी बाहेर पडत आहे; स्व-तेजसा-तुमच्या तेजाने; विश्वम्—विश्व; इदम्—हे; तपन्तम्—तप्त झालेला.

तुम्ही आदी, मध्य आणि अंतरहित आहात. तुमचा महिमा अगाध आहे. तुम्हाला असंख्य बाहू आहेत. चंद्र आणि सूर्य हे तुमचे नेत्र आहेत. तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्याच तेजाने तप्त करीत असल्याचे मी पाहात आहे.

तात्पर्य: भगवंतांची षडेश्वर्ये अनंत आहेत. या गोष्टीची या ठिकाणी तसेच इतरत्रही पुनरुक्ती करण्यात आली आहे, परंतु शास्त्रांनुसार श्रीकृष्णांच्या महिमांची पुनरुक्ती हा साहित्यिक दोष मानला जात नाही. असे म्हटले आहे की, भारावून गेल्यावर किंवा विस्मय किंव तल्लीन झाल्यावर अशा विधानांची पुनरुक्ती होत असते; तो दोष नव्हे.

« Previous Next »