No edit permissions for मराठी

TEXT 20

dyāv ā-pṛthivyor idam antaraṁ hi
vyāptaṁ tvayaikena diśaś ca sarvāḥ
dṛṣṭvādbhutaṁ rūpam ugraṁ tavedaṁ
loka-trayaṁ pravyathitaṁ mahātman

 
द्यौ-बाह्य आकाश; -पृथिव्योः-पृथ्वीपर्यत; इदम्-हे; अन्तरम्-मध्ये; हि-निश्चितच; व्याप्तम्-व्यापलेली; त्वया-तुम्ही; एकेन-एकट्याने;दिशः-दिशा;-आणि; सर्वा:-सर्व; दृष्ट्रा-पाहून; अद्भुतम्‌ -अद्भुत; रूपम्-रूप; उग्रम्-उग्र; तव-तुमचे; इदम्-हे; लोक-लोकः; त्रयम्-तीन; प्रव्यथितम्-अतिशय व्यथित झाले आहे; महा-आत्मन्-हे महात्मन्,

तुम्ही एकट्यानेच संपूर्ण आकाश, ग्रहलोक आणि त्यांच्यामधील सर्व दिशा व्याप्त केल्या आहेत. हे महात्मन्! तुमचे हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रहलोक अतिशय व्यथित झाले आहेत.

तात्पर्य: या श्लोकामध्ये द्यावा पृथिव्यो. (पृथ्वी आणि स्वर्ग यातील अंतर) आणि लोकत्रयम् (त्रिलोक) हे शब्द महत्वपूर्ण आहेत. कारण यावरून असे दिसते की, केवळ अर्जुनच नव्हे तर इतर लोकांतील इतरजणांनी सुद्धा हे विश्वरूप पाहिले. अर्जुनाने विश्वरूप पाहणे हे काही स्वप्न नव्हते. ज्यांना ज्यांना भगवंतांनी दिव्य दृष्टी प्रदान केली होती ते सर्वजण हे विश्वरूप पाहू शकले.

« Previous Next »