TEXTS 41-42
sakheti matvā prasabhaṁ yad uktaṁ
he kṛṣṇa he yādava he sakheti
ajānatā mahimānaṁ tavedaṁ
mayā pramādāt praṇayena vāpi
yac cāvahāsārtham asat-kṛto ’si
vihāra-śayyāsana-bhojaneṣu
eko ’tha vāpy acyuta tat-samakṣaṁ
tat kṣāmaye tvām aham aprameyam
सखा-मित्र, इति-याप्रमाणे; मत्वा-मानून, प्रसभम्—अनादराने; यत्-जे काही; उक्तम्—-बोललो; हे कृष्ण-हे कृष्ण; हे यादव-हे यादव; हे सखे-हे मित्र; इति-याप्रमाणे; अजानता-अजाणपणाने, महिमानम्-महिमा;तव-तुमचा; इदम्-हा;मया-माइयाद्वारे; प्रमादात्-चुकीने किंवा मूर्खतेमुले; प्रणयेन-प्रेमाने, वा अपि-अथवा, यत्-जे, च-सुद्धा, अवहास-अर्थम्विनोदाने; असत्-कृतः-अपमान केला; असि-असेल; विहार-विहार करते वेळी; शय्या-शयन करताना, आसन-बसताना; भोजनेषु-एकत्र भोजन करताना; एक:-एक; अथ वा-किंवा; अपि-सुद्धा; अच्युत-हे अच्युत; तत्-समक्षम्-सहकान्यांमध्ये किंवा सर्वांसमक्ष; तत्-ते सर्व; क्षामये-क्षमा मागतो; त्वाम्-तुमच्याकडून; अहम्-मी; अप्रमेयम्-अपरिमित.
मी तुम्हाला तुमचा महिमा न जाणता माझा मित्र मानून, हे कृष्ण, हे यादव! हे मित्र असे अनादराने संबोधिले आहे. प्रेमाने किंवा प्रमादाने मी जे काही केले असेन त्याबद्दल कृपया मला क्षमा करा. विश्रांतीच्या वेळी, चेष्टा करताना, एकाच शय्येवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना अथवा बसताना आणि कधी कधी एकांतवासात तर कधी अनेक मित्रांसमक्ष मी तुमचा अपमान केला आहे. हे अच्युत! माझ्या त्या सर्व अपराधांची क्षमा करा.
तात्पर्य: अर्जुनासमोर श्रीकृष्णांनी आपले विश्वरूप जरी प्रकट केले तरी अर्जुनाला श्रीकृष्णांशी असणा-या आपल्या मित्र-संबंधांचे स्मरण आहे. यास्तव तो क्षमायाचना करीत आहे आणि मित्रसंबंधापासून घडणा-या अनौपचारिक कृतींबद्दल आपल्याला क्षमा करण्याची विनंती करीत आहे. श्रीकृष्णांनी आपला जिवलग सखा म्हणून अर्जुनाला जरी आपले विश्वरूप दाखविले असले तरी, श्रीकृष्ण असे विराट रूप धारण करू शकतील हे आपल्याला पूर्वी माहीत नसल्याचे अर्जुन मान्य करीत आहे. अर्जुनाला माहीत नव्हते की, आपण श्रीकृष्णांचे ऐश्वर्य न जाणता किती वेळा त्यांना 'हे मित्रा', 'हे कृष्ण ', 'हे यादव' असे संबोधून त्यांचा अपमान केला ते अर्जुनाशी मित्रत्वाने वागले. भगवंत आणि भक्तांमध्ये असे दिव्य प्रेमाचे आदानप्रदान होते. श्रीकृष्ण आणि जीव यांमधील संबंध हा शाश्वत असतो आणि अर्जुनाच्या उदाहरणावरून पाहिल्याप्रमाणे या संबंधांचे विस्मरण होऊ शकत नाही. अर्जुनाने जरी विश्वरूपाचे ऐश्वर्य पाहिले तरी तो श्रीकृष्णांशी असलेला सखाभाव विसरू शकत नव्हता.