No edit permissions for मराठी

TEXT 6

paśyādityān vasūn rudrān
aśvinau marutas tathā
bahūny adṛṣṭa-pūrvāṇi
paśyāścaryāṇi bhārata

पश्य-पहा; आदित्यान्-अदितीच्या बारा पुत्रांना; वसून्-आठ वसूना; रुद्रान्-अकरा रुद्रांना; अश्विनौ-दोन अश्विनीकुमारांना; मरुत:-एकोणपन्नास मरुद्गणांना (वायुदेवांना); तथा-तथा; बहूनि-अनेक; अदृष्ट-तून पाहिलेल्या; पूर्वाणि-पूर्वी; पश्य-पाहा; आश्चर्याणि-सर्व आश्चर्यांना; भारत- हे भरतश्रेष्ठा.

हे भरतश्रेष्ठा! आदित्य, वसू, रुद्र आणि अश्विनीकुमारांच्या विविध रूपांना आणि इतर सर्व देवदेवतांना या ठिकाणी पाहा. यापूर्वी कोणत्याही मनुष्याने कधीच न पाहिलेल्या किंवा न ऐकलेल्या अनेक अद्भुत रूपांना पाहा.

तात्पर्य: अर्जुन श्रीकृष्णांचा निकटवर्ती मित्र आणि अत्यंत विद्वान असला तरी सुद्धा त्याला श्रीकृष्णांचे पूर्ण ज्ञान प्राप्त होणे शक्य नव्हते. या श्लोकामध्ये म्हटले आहे की, मनुष्याने या सर्व अभिव्यक्ती आणि रूपांना कधी पाहिलेही नाही किंवा ऐकलेही नाही. आता श्रीकृष्ण या सर्व अद्भुत रूपांना प्रकट करीत आहेत.

« Previous Next »