No edit permissions for मराठी

TEXT 5

śrī-bhagavān uvāca
paśya me pārtha rūpāṇi
śataśo ’tha sahasraśaḥ
nānā-vidhāni divyāni
nānā-varṇākṛtīni ca

श्री-भगवान् उवाच-श्रीभगवान म्हणाले; पश्य-पहा; मे-माझे; पार्थ-हे पार्थ; रूपाणि-रूपे; शतशः-शेकडो; अथ-सुद्धा; सहस्रशः-सहस्र; नाना-विधानि-नानाविध; दिव्यानि-दिव्य, अलौकिक; नाना-नाना प्रकारचे; वर्ण-वर्णाची; आकृतीनि-रूपे; -सुद्धा.

श्रीभगवान म्हणाले, हे अर्जुना! हे पार्था! आता माझे ऐश्वर्य पहा, अलौकिक आणि नाना वर्णानी युक्त अशी माझी सहस्रावधी रूपे पहा.

तात्पर्य: अर्जुन श्रीकृष्णांना त्यांच्या विश्वरूपामध्ये पाहू इच्छित होता. विराटरूप हे जरी दिव्य असले तरी प्राकृतिक सृष्टीमध्ये ते प्रकट झाले होते. यास्तव ते रूप भौतिक प्रकृतीच्या तात्पुरत्या काळाच्या अधीन असते. ज्याप्रमाणे भौतिक प्रकृती ही व्यक्त होते आणि अव्यक्त होते त्याप्रमाणे श्रीकृष्णांचे विराटरूपही व्यक्त आणि अव्यक्त होते. श्रीकृष्णांच्या इतर रूपांप्रमाणे ते वैकुंठलोकात नित्य स्थित नसते. भक्तांच्या बाबतीत विचार केल्यास, भक्त हा विराटरूप पाहण्यास उत्सुक नसतो; परंतु अर्जुनाला श्रीकृष्णांना या रूपामध्ये पाहावयाचे होते म्हणून श्रीकृष्ण आपले हे रूप प्रकट करतात. सामान्य मनुष्याला हे विश्वरूप पाहणे शक्य नाही. मनुष्याला हे रूप पाहावयाचे असेल तर श्रीकृष्णांनी त्याला शक्ती प्रदान करणे आवश्यक आहे.

« Previous Next »