No edit permissions for मराठी

TEXT 27

yāvat sañjāyate kiñcit
sattvaṁ sthāvara-jaṅgamam
kṣetra-kṣetrajña-saṁyogāt
tad viddhi bharatarṣabha

यावत्—जे काही; सञ्जायते—निर्माण होते; किञ्चित्—कोणतेही; सत्त्वम्—अस्तित्व; स्थावर— अचर; जङ्गमम्-चर; क्षेत्र-शरीराचे; क्षेत्र-ज्ञ-आणि शरीराचा ज्ञाता, क्षेत्रज्ञ; संयोगात्-दोहोंच्या संयोगाने; तत् विद्धि-तू जाणून घे; भरत-ऋषभ-हे भरतर्षभ.

हे भरतर्षभ!चर आणि अचर असे तू जे काही अस्तित्वात पाहात आहेस ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या केवळ संयोगापासून निर्माण होते हे जाण.

तात्पर्य: या श्लोकामध्ये, सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वीही अस्तित्वात असणा-या जीव आणि भौतिक प्रकृती या दोहोंचे विश्लेषण करण्यात आले आहे. सर्व सृष्ट पदार्थ म्हणजे भौतिक प्रकृती आणि जीव यांचा संयोग होय. सृष्टीमधील वृक्ष, पर्वत इत्यादी अचर वस्तू आणि इतर सर्व चर वस्तू या सर्व भौतिक प्रकृती आणि परा प्रकृती, जीव यांच्या संयोगामुळे निर्माण होतात. परा पदार्थ आणि प्रकृती यांचा संबंध नित्य आहे आणि यांचा संयोग भगवंतांमुळे होतो म्हणून भगवंत हे परा आणि अपरा या दोन्ही प्रकृतींचे नियंता आहेत. भौतिक प्रकृतीची निर्मिती त्यांनीच केली आहे आणि परा प्रकृतीला या अपरा प्रकृतीमध्ये स्थित केले जाते व या प्रकारे सा-या क्रिया आणि सृष्ट पदार्थ व्यक्त होतात.

« Previous Next »