No edit permissions for मराठी

TEXT 31

yadā bhūta-pṛthag-bhāvam
eka-stham anupaśyati
tata eva ca vistāraṁ
brahma sampadyate tadā

यदा-जेव्हा; भूत-जीवांचे; पृथक-भावम्-पृथक् स्वरूप; एक-स्थम्-एकच स्थानी; अनुपश्यति-प्रमाणित अधिका-याच्या माध्यमाने पाहण्याचा प्रयत्न करतो; ततः एव-त्यानंतर; -सुद्धा; विस्तारम्-विस्तार; ब्रह्म-ब्रह्म; सम्पद्यते-तो प्राप्त करतो; तदा-त्या वेळी.

जेव्हा विवेकी मनुष्य निरनिराळ्या भौतिक शरीरांमुळे होणारे पृथक् स्वरूप पाहण्याचे थांबवितो आणि जीवांचा सर्वत्र कसा विस्तार झाला आहे हे पाहतो तेव्हा त्याला ब्रह्माची प्राप्ती होते.

तात्पर्यः जेव्हा मनुष्य पाहू शकतो की, आत्म्याच्या विविध इच्छांनुसार निरनिराळ्या शरीरांची निर्मिती होते आणि जीवाचा त्यांच्याशी काही संबंध नसतो तेव्हा तो यथार्थरूपाने पाहतो. देहात्मबुद्धीमुळे आपल्याला कोणी देवता असल्याचे, कोणी मनुष्य असल्याचे तर कोणी कुत्रा, मांजर इत्यादी असल्याचे आढळते. परंतु ही वास्तविक दृष्टी नसून भौतिक दृष्टी आहे. देहात्मबुद्धीमुळेच आपल्याला हे प्राकृत भिन्नत्व दिसते. भौतिक शरीराच्या विनाशानंतर आत्मा हा एकच राहतो. भौतिक प्रकृतीच्या संपर्कामुळे जीवात्म्याला निरनिराळ्या प्रकारचे देह प्राप्त होतात. जेव्हा मनुष्य हे पाहू शकतो तेव्हा त्याला आध्यात्मिक दृष्टी प्राप्त होते. याप्रमाणे मानव, प्राणी, लहान, मोठा इत्यादी पृथक्भावातून मुक्त झाल्यावर मनुष्याची चेतना शुद्ध होते आणि आपल्या आध्यात्मिक स्वरूपात स्थित होऊन तो कृष्णभावनेचा विकास करू शकतो. त्यानंतर तो सर्व गोष्टी कशा प्रकारे पाहतो याचे स्पष्टीकरण पुढील श्लोकामध्ये करण्यात आले आहे.

« Previous Next »