No edit permissions for मराठी

TEXT 10

rajas tamaś cābhibhūya
sattvaṁ bhavati bhārata
rajaḥ sattvaṁ tamaś caiva
tamaḥ sattvaṁ rajas tathā

रजः-रजोगुणः; तमः-तमोगुण; -सुद्धा; अभिभूय-पार करून; सत्त्वम्-सत्त्वगुण; भवति—प्रमुख होतो; भारत—हे भारत; रजः-रजोगुण; सत्त्वम्-सत्त्वगुणः; तमः-तमोगुण; -सुद्धा; एव-त्याचप्रमाणे; तमः-तमोगुण; सत्त्वम्-सत्त्वगुण; रजः-रजोगुणः; तथा-याप्रमाणे.

हे भारता! कधी कधी रजोगुण व तमोगुण यांचा पाडाव करून सत्त्वगुण प्रमुख होतो. कधी कधी रजोगुण, सत्व आणि तम यांचा पाडाव करतो आणि इतर वेळी तमोगुण, सत्व आणि रज यांचा पाडाव करतो. याप्रमाणे वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा सुरु असते.

तात्पर्यः जेव्हा रजोगुण प्रमुख होतो तेव्हा सत्व आणि तमोगुण यांचा पाडाव होतो. जेव्हा सत्वगुण प्रधान होतो तेव्हा रज आणि तम यांचा पाडाव होतो. आणि तमोगुण प्रभावी असतो तेव्हा रज आणि सत्व यांचा पाडाव होतो. ही स्पर्धा सदैव सुरूच असते. म्हणून ज्याला खरोखर कृष्णभावनेमध्ये उन्नती करण्याची इच्छा आहे, त्याला त्रिगुणांच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे. विशिष्ट गुणांचे प्रामुख्य हे व्यवहारात, कार्यात, खाण्यापिण्यात इत्यादी गोष्टींमध्ये दिसून येते. या सर्वांचे वर्णन पुढील अध्यायामध्ये करण्यात येईल. परंतु जर मनुष्याची इच्छा असेल तर अभ्यासाने तो रजोगुण आणि तमोगुण यांचा पाडाव करून सत्त्वगुणाची वृद्धी करू शकतो. त्याचप्रमाणे रजोगुणाची वृद्धी करून सत्व आणि तम यांचा पाडाव करू शकतो किंवा तमोगुणाची वृद्धी करून सत्व आणि रज यांचा पराजय करू शकतो. जरी प्रकृतीचे हे तीन गुण असले तरी, जर मनुष्य निश्चयी असेल तर त्याला सत्वगुणाचा कृपालाभ प्राप्त होऊ शकतो व यामुळे तो सत्त्वगुणाच्याही पलीकडे जाऊन विशुद्ध सत्त्वगुणात स्थित होऊ शकतो. या विशुद्ध सत्वयुक्त अवस्थेला वसुदेव अवस्था असे म्हटले जाते आणि या अवस्थेमुळे मनुष्य भगवविज्ञान जाणू शकतो. विशिष्ट कार्यांच्या लक्षणावरून मनुष्य कोणत्या गुणामध्ये स्थित आहे ते समजू शकते.

« Previous Next »