No edit permissions for मराठी

TEXT 9

sattvaṁ sukhe sañjayati
rajaḥ karmaṇi bhārata
jñānam āvṛtya tu tamaḥ
pramāde sañjayaty uta

सत्वम्-सत्वगुण, सुखे-सुखामध्ये; सञ्जयति-बद्ध करती; रज:-रजोगुण, कर्मणि-सकाम कर्मामध्ये; भारत-हे भारता; ज्ञानम्-ज्ञान; आवृत्य-आवृत करून; तु-परंतु; तमः-तमोगुण; प्रमादे-प्रमादामध्ये किंवा मूर्खपणामध्ये; सञ्जति-बद्ध करतो; उत-असे म्हटले जाते.

हे भारता! सत्त्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजोगुण सकाम कर्माशी बांधतो आणि तमोगुण, त्याचे ज्ञान आवृत्त करून मूर्खपणाशी बांधतो.

तात्पर्यः सत्वगुणी मनुष्य हा आपल्या कर्माने किंवा तात्विक शोधाने संतुष्ट असतो. उदाहरणार्थ, तत्वज्ञानी, वैज्ञानिक किंवा शिक्षणज्ज्ञ आपापल्या विशिष्ट ज्ञानक्षेत्रामध्ये संलग्न असतात आणि त्यातच ते समाधानी असतात. रजोगुणी मनुष्य हा सकाम कर्मामध्ये संलग्न असतो आणि आपल्याला शक्य असेल तितके धनार्जन करतो आणि सत्कार्याकरिता त्याचा उपयोग करतो. कधी कधी तो रुग्णालये बांधतो, धर्मार्थ संस्थांना दान करतो इत्यादी. ही रजोगुणी मनुष्याची लक्षणे आहेत. तमोगुण मनुष्याचे ज्ञान आच्छादित करतो. तमोगुणाच्या प्रभावाखाली मनुष्य जे काही करतो ते त्याच्या किंवा इतरांच्याही भल्यासाठी नसते.

« Previous Next »