No edit permissions for मराठी

TEXT 12

lobhaḥ pravṛttir ārambhaḥ
karmaṇām aśamaḥ spṛhā
rajasy etāni jāyante
vivṛddhe bharatarṣabha

लोभः-लोभ; प्रवृत्तिः -कर्म; रम्भः-प्रयत्न; कर्मणाम्-कर्मामध्ये; अशमः -अनियंत्रित; स्पृहा-इच्छा; रजसि-रजोगुणाची; एतानि-ही सर्व; जायन्ते-उत्पन्न होतात; विवृद्धे-वाजवीपेक्षा अधिक; भरत-ऋषभ-हे भारतर्षभ.

हे भरतर्षभ! जेव्हा रजोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अत्यधिक आसक्ती, सकाम कर्म, महत्‌प्रयास, अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षणे उत्पन्न होतात.

तात्पर्य : रजोगुणी मनुष्य, त्याने प्राप्त केलेल्या स्थितीत कधीच संतुष्ट राहात नाही. आपला दर्जा वाढविण्याची त्याला सदैव लालसा असते. जर त्याला राहण्याकरिता निवासस्थान बांधावयाची इच्छा असेल तर तो राजवाड्याप्रमाणेच घर बांधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो; जणू काय तो त्या घरामध्ये नित्य वास करणार आहे. इंद्रियतृप्ती करण्याची त्याच्यामध्ये तीव्र इच्छा उत्पन्न होते. त्यांच्या इंद्रियतृप्तीला अंतच नसतो. त्याला सदैव आपल्या कुटुंबाबरोबर नाही. ही सर्व लक्षणे रजोगुणाची द्योतक आहेत.

« Previous Next »