No edit permissions for मराठी

TEXT 13

aprakāśo ’pravṛttiś ca
pramādo moha eva ca
tamasy etāni jāyante
vivṛddhe kuru-nandana

अप्रकाशः-अंधकार; अप्रवृत्तिः-निष्क्रियताः -आणि; प्रमादः-मूर्खता किंवा प्रमाद; मोहः-मोहः एव—निश्चितपणे; —सुद्धाः तमसि—तमोगुणः एतानि-ही; जायन्ते—प्रकट होतात; विवृद्धे-जेव्हा उत्पन्न होतात; कुरु-नन्दन-हे कुरुनंदन.

हे कुरुनंदन! जेव्हा तमोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अंधकार, निष्क्रियता, मूखपणा आणि मोह हे प्रकट होतात.

तात्पर्यः जेव्हा प्रकाश नसतो तेव्हा ज्ञानाचा अभाव असतो. तमोगुणी मनुष्य हा नियामक तत्त्वांनुसार कार्य करीत नाही, त्याला आपल्या लहरीप्रमाणे व्यर्थ कर्म करण्याची इच्छा असते. जरी याच्याकडे योग्य ती कार्यक्षमता असली तरी तो काहीही प्रयत्न करीत नाही. याला मोह असे म्हणतात. त्याच्या ठिकाणी चेतना असली तरी त्याचे जीवन निष्क्रियच असते. ही सर्व तमोगुणी मनुष्याची लक्षणे आहेत.

« Previous Next »