No edit permissions for मराठी

TEXT 18

ūrdhvaṁ gacchanti sattva-sthā
madhye tiṣṭhanti rājasāḥ
jaghanya-guṇa-vṛtti-sthā
adho gacchanti tāmasāḥ

ऊध्र्वम्-उध्वं; गच्छन्ति-जातात; सत्त्व-स्था:-सत्त्वगुणात स्थित झालेले; मध्ये-मध्ये; तिष्ठन्ति-निवास करतात; राजसाः-रजोगुणामध्ये स्थित असलेले; जघन्य-निंद्य किंवा अघोरी; गुण-गुण; वृत्ति-स्था:-ज्याची वृत्ती किंवा व्यवसाय; अधः-निम्न किंवा अधोगती; गच्छन्ति-जातात; तामसाः-तमोगुणी लोक,

सत्त्वगुणी मनुष्य क्रमशः उध्र्वगतीने उच्चतर लोकांमध्ये जातात, रजोगुणी मनुष्य  पृथ्वीलोकात वास करतात आणि जे निंद्य तमोगुणात स्थित आहेत त्यांचे नरकलोकात अध:पतन होते.

तात्पर्य: या श्लोकात प्रकृतीच्या तीन गुणांतील कर्माचे परिणाम अधिक विस्तृतपणे सांगण्यात आले आहेत. स्वर्गलोकांचा समावेश असलेल्या उच्चतर लोकांच्या मालिकेमध्ये अत्यंत उन्नतावस्थेतील जीव वास करतात. ज्या मात्रेमध्ये सत्वगुणाचा विकास होतो त्यानुसार जीवांना या मालिकेमधील विविध लोकांची प्राप्ती होऊ शकते. या लोकांमध्ये सत्यलोक किंवा ब्रह्मलोक हा अत्युच्च लोक आहे आणि या ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मांडातील आदिजीव, ब्रह्मदेव वास करतात. आपण पूर्वीच पाहिले आहे की, ब्रह्मलोकातील अद्भुतकारक जीवनाचे अनुमान करणे कठीण आहे; परंतु या प्रकारचे उन्नत जीवन सत्वगुणामुळे आपल्याला प्राप्त होऊ शकते.

          रजोगुण हा एक प्रकारचे मिश्रण आहे. तो सत्वगुण आणि तमोगुणाच्या मध्यभागी आहे. मनुष्य हा सदैव शुद्ध नसतो; परंतु तो जरी पूर्णपणे रजोगुणामध्ये स्थित असला तरी तो या पृथ्वीवर केवळ एक राजा किंवा धनवान मनुष्य म्हणून राहतो. परंतु गुणांच्या मिश्रणामुळे त्याची अधोगतीही होऊ शकते. या पृथ्वीवरील रजोगुणी किंवा तमोगुणी लोक यंत्राच्या साहाय्याने बळेच उच्चतर लोकांमध्ये जाऊ शकत नाहीत. रजोगुणी पुढील जन्मात वेडा बनण्याचीही शक्यता असते.

          या ठिकाणी कनिष्ठ गुणाचे, तमोगुणाचे वर्णन जघन्य असे करण्यात आले आहे. तमोगुणाच्या वृद्धीचे परिणाम अत्यंत धोकादायक असतात. भौतिक प्रकृतीमधील हा अत्यंत कनिष्ठ गुण आहे. मानव योनीच्या खालोखाल पक्षी, पशू, सरपटणारे प्राणी, वृक्ष इत्यादी ऍशी लाख योनी आहेत आणि तमोगुणाच्या विकासानुसार मनुष्याची या अधम योनीप्रत अवनती होते. या श्लोकामधील तामसा: हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. तामसा हा शब्द जे लोक उच्चतर गुणाप्रत प्रगती न करता निरंतर तमोगुणातच राहतात, त्यांचा दर्शक आहे. त्यांचे भविष्य अत्यंत अंधकारमय असते.

          तमोगुणी आणि रजोगुणी मनुष्यांना सत्वगुणाप्रत उन्नत होण्याची संधी आहे व ही संधी म्हणजे कृष्णभावनामृत होय. परंतु जो या संधीचा लाभ घेत नाही तो निश्चितपणे कनिष्ठ गुणातच राहील.

« Previous Next »