No edit permissions for मराठी

TEXT 8

tamas tv ajñāna-jaṁ viddhi
mohanaṁ sarva-dehinām
pramādālasya-nidrābhis
tan nibadhnāti bhārata

तमः-तमोगुण; तु-परंतुः अज्ञान-जम्--अज्ञानाने उत्पन्न झालेला; विद्धि-जाण; मोहनम्- मोह; सर्व-देहिनाम्-सर्व देहधारी जीवांच्या; प्रमाद-प्रमाद; आलस्य-आळस; निद्राभिःआणि निद्रा; तत्-तो; निबध्नाति-बद्ध करतो; भारत-हे भारता.

हे भारता! अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारी जीवांचा मोह असल्याचे जाण. प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत व ते बद्ध जीवाला बंधनकारक ठरतात.

तात्पर्य: या श्लोकामधील तु या शब्दाचे विशेष आयोजन अत्यंत महत्वपूर्ण आहे. याचा अर्थ आहे की, तमोगुण हा बद्ध जीवांचा एक अत्यंत विशिष्ट गुण आहे. तमोगुण हा सत्वगुणाच्या अगदी विपरीत आहे. सत्वगुणामध्ये ज्ञानाच्या विकासामुळे, मनुष्य सारासार जाणू शकतो, पण तमोगुण हा याच्या अगदी विपरीत आहे. तमोगुणामुळे प्रभावित झालेला भ्रांत होतो आणि असा म्हणून तथ्य जाणू शकत नाही. यास्तव प्रगती होण्याऐवजी त्याची अधोगतीच होते. तमोगुणाची व्याख्या वेदांमध्ये पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे. वस्तुयाथात्म्यज्ञानावरकं विपर्ययज्ञानजनकं तमः तमोगुणाच्या प्रभावामुळे मनुष्य वस्तूला यथार्थ रूपात जाणू शकत नाही. उदाहरणार्थ, प्रत्येकजण पाहू शकतो की, आपल्या आजोबांचा मृत्यू झाला आहे आणि स्वतःचाही मृत्यू होणार आहे, कारण मनुष्य हा मर्त्स आहे. तसेच तो जन्म देणारी मुलेही मृत्युपंथास जाणार आहेत. म्हणून मृत्यू हा निश्चित आहे, तरीही लोक मूखपणे धनसंचय करीत आहेत आणि सनातन आत्म्याची उपेक्षा करून रात्रंदिवस परिश्रम करीत आहेत. हाच प्रमाद आहे. आपल्या मूर्खपणामुळे ते आध्यात्मिक उन्नती करण्यास उत्सुक नसतात. असे लोक अत्यंत आळशी असतात. जेव्हा त्यांना आध्यात्मिक सत्संगासाठी निमंत्रित केले जाते तेव्हा त्यांना अशा गोष्टींमध्ये मुळीच स्वारस्य नसते. असे लोक रजोगुणाद्वारे नियंत्रित मनुष्यांप्रमाणे सक्रियही नसतात. म्हणून तमोगुणी मनुष्याचे आणखी एक लक्षण म्हणजे तो आवश्यकतेपेक्षाही अधिक झोपतो. वस्तुतः सहा तास झोप पुरेशी असते; परंतु तमोगुणी मनुष्य दिवसातून किमान दहा ते बारा तास झोपतो. असा मनुष्य सदैव खिन्न असतो आणि मादक पदार्थ व झोपेच्या आहारी गेलेला असतो. तमोगुणाद्वारे बद्ध झालेल्या मनुष्याची ही लक्षणे आहेत.

« Previous Next »