No edit permissions for मराठी

TEXTS 11-12

cintām aparimeyāṁ ca
pralayāntām upāśritāḥ
kāmopabhoga-paramā
etāvad iti niścitāḥ

āśā-pāśa-śatair baddhāḥ
kāma-krodha-parāyaṇāḥ
īhante kāma-bhogārtham
anyāyenārtha-sañcayān

चिन्ताम्-चिंता आणि भय; अपरिमेयाम्-अमर्याद; -आणि; प्रलय-अन्ताम्-आमरणान्त; उपाश्रिता:-आश्रय घेऊन; काम-उपभोग-इंद्रियतृप्ती; परमाः-जीवनाचे परमलक्ष्य; एतावत्‌-त्याप्रमाणे; इति-असे; निश्चिताः-निश्चित करून; आशा-पाश-आशेच्या पाशांनी बांधले जाणे; शतैः-शेकडो; बद्धाः-बद्ध होऊन; काम-काम; क्रोध-आणि क्रोध; परायणाः-परायण झालेले; ईहन्ते-इच्छा करतात; काम-काम; भोग-इंद्रियोपभोग; अर्थम्-च्या उद्देशाने; अन्यायेन—अन्यायाने, अर्थ—धनाचे, सञ्चयान्—संचय,

इंद्रियतृप्ती करणे हीच मानव संस्कतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशाप्रकारे त्यांना मरेतोपर्यंत अमर्याद चिंतांनी ग्रासलेले असते. शेकडो, हजारो आशारूपी पाशांनी बद्ध झालेले आणि कामक्रोध परायण झालेले हे आसुरी लोक इंद्रियतृप्तीकरिता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात.

तात्पर्य: आसुरी लोकांना वाटते की, इंद्रियोपभोग प्राप्त करणे हेच जीवनाचे अंतिम लक्ष्य आहे आणि मरणापर्यंत त्यांची हीच धारणा असते. त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास नसतो तसेच मनुष्याला आपल्या आयुष्यात आखलेल्या योजनांना कधीच अंत नसतो आणि ते योजनांमागून योजना आखत जातात; परंतु या योजनांची कधीच पूर्ती होत नाही. आम्हाला अशा आसुरी मनोवृत्तीच्या मनुष्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे. मरणसमयी सुद्धा तो वैद्याला आपले आयुष्य चार वर्षांनी वाढविण्याची विनंती करीत होता, कारण त्याच्या योजना अजूनही पूर्ण झाल्या नव्हत्या. असे मूर्ख  जाणत नाहीत की, वैद्य आपले आयुष्य क्षणभरही वाढवू शकत नाहीत. मृत्यूची सूचना आली की तेथे मनुष्याच्या इच्छेचा मुळीच विचार होत नसतो. प्रकृतीचे नियम, मनुष्याला जितका भोग ठरवून दिलेला असेल त्यापेक्षा एक क्षणभरही अधिक जगू देत नाही.

आसुर मनुष्याला परमेश्वरावर किंवा अंतर्यामी परमात्म्यावर विश्वस नसतो आणि म्हणून केवळ इंद्रियतृप्तीकरिता तो सर्व प्रकारचे पापकर्म करतो. त्याच्या हृदयात एक साक्षीही असतो हे त्याला माहीत नसते. परमात्मा हा जीवाच्या सर्व क्रियांचे निरीक्षण करीत असतो. उपनिषदात याबाबतीत उदाहरण देण्यात आले आहे की, एका झाडावर दोन पक्षी बसलेले आहेत त्यापैकी एक पक्षी शाखेवरील सुखदुःखरूपी फळे भोगतो आणि दुसरा पक्षी केवळ साक्षी असतो. परंतु आसुरी मनुष्याला वेदांचे ज्ञानही नाही Next »आणि वेदांवर श्रद्धाही नसते. म्हणून परिणामांची चिंता न करता इंद्रियतृप्तीकरिता स्वेच्छाचार करण्यास आपण स्वतंत्र आहोत असे तो समजतो.

« Previous Next »