TEXTS 13-15
idam adya mayā labdham
imaṁ prāpsye manoratham
idam astīdam api me
bhaviṣyati punar dhanam
asau mayā hataḥ śatrur
haniṣye cāparān api
īśvaro ’ham ahaṁ bhogī
siddho ’haṁ balavān sukhī
āḍhyo ’bhijanavān asmi
ko ’nyo ’sti sadṛśo mayā
yakṣye dāsyāmi modiṣya
ity ajñāna-vimohitāḥ
इदम्-हे; अद्य-आज; मया-मी; लब्धम्-मिळविले; इमम्-हे; प्राप्स्ये-मी प्राप्त करीन; मनः-रथम्-माझ्या इच्छेप्रमाणे; इदम्-हे; अस्ति-आहे; इदम्-हे; अपि-सुद्धा; मे-माझे; भविष्यति-भविष्यामध्ये अधिक वृद्धी होईल; पुनः-पुन्हा; धनम्-धन; असौ-तो; मया-माझ्याद्वारे; हत:-मारला गेला आहे; शत्रुः-शत्रू: हनिष्ये-मी हत्या करेन; च-सुद्धा; अपरान्-इतर; अपि-निश्चितपणे; ईश्वरः-ईश्वर; अहम्-मी आहे; अहम्-मी आहे; भोगी-भोगी; सिद्धः-परिपूर्ण; अहम्-मी आहे; बल-वान्-बलवान; सुखी-सुखी; आढय:-धनाढ्य; अभिजन-वान्-कुलवान, वैभवशाली नातलग असलेला; अस्मि-मी आहे; कः-कोण; अन्य:-इतर; अस्ति-आहे; सदृशः-सारखा; मया-मी;यक्ष्ये-मी यज्ञ करेन; दास्यामि-मी दान करेन, मोदिष्ये-मी मौज करेन, इति-याप्रमाणे, अज्ञान-अज्ञानाने, विमोहिता:-मोहित झालेले.
आसुरी मनुष्य विचार करतो की, 'आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे. मीच भोक्ता आहे. मी परिपूर्ण, बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे’ माझ्यासारख्या बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौजमजा करेन. अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात.