No edit permissions for मराठी

TEXT 22

adeśa-kāle yad dānam
apātrebhyaś ca dīyate
asat-kṛtam avajñātaṁ
tat tāmasam udāhṛtam

अदेश-अयोग्य किवा अशुद्ध स्थळी; काले- अकाली; यत्-जे, दानम्—दान; अपात्रेभ्यः अपात्र व्यक्तींना; -सुद्धा; दीयते-दिले जाते; असत्-कृतम्-अनादराने; अवज्ञातम् - अवहेलनापूर्वक; तत्-ते; तामसाम्-तामसिक; उदाहृतम्-म्हटले जाते.

अयोग्य स्थळी, अकाली, अपात्र व्यक्तींना आणि अनादराने तसेच अवहेलनापूर्वक दिल्या जाणा-या दानाला तामसिक दान म्हटले जाते.

तात्पर्य: मद्यपान अथवा जुगार याकरिता केलेल्या दानाचा या श्लोकामध्ये निषेध केलेला आहे. अशा प्रकारच्या दानाला तामसिक दान म्हटले जाते. असे दान लाभप्रद तर नसतेच, उलट पापी  लोकांना मात्र प्रोत्साहन मिळते. त्याचप्रमाणे, जर मनुष्याने योग्य व्यक्तीला अनादराने व अवहेलनापूर्वक दान दिले तर अशा दानालाही तामसिक दानच म्हटले जाते.

« Previous Next »