TEXTS 26-27
sad-bhāve sādhu-bhāve ca
sad ity etat prayujyate
praśaste karmaṇi tathā
sac-chabdaḥ pārtha yujyate
yajñe tapasi dāne ca
sthitiḥ sad iti cocyate
karma caiva tad-arthīyaṁ
sad ity evābhidhīyate
सत्-भावे-परब्रह्माच्या भावाने; साधु-भावे-भक्ताच्या भावाने; च-सुद्धा; सत्-सत्; इति-याप्रमाणे; एतत्-हा; प्रयुज्यते-योजिला जातो, प्रशस्ते-प्रमाणित: कर्मणि-कमें, तथा-सुद्धा, सत्-शब्दः-सत् हा शब्द; पार्थ-हे पार्थ, युज्यते-योजिला जातो; यज्ञे-यज्ञामध्ये; तपसि-तपामध्ये; दाने-दानामध्ये; च-सुद्धा; स्थितिः-स्थिती; सत्-परब्रह्म; इति-याप्रमाणे; चआणि; उच्यते-उच्चारला जातो; कर्म-कर्म; च-सुद्धा; एव-निश्चितपणे; तत्-त्या; अर्थीयम्-च्या करिता; सत्-परब्रह्म; इति-याप्रमाणे; एव-निश्चितपणे; अभिधीयते-निर्देशित केला जातो.
परम सत्य हे भक्तिमय यज्ञाचे उद्दिष्ट आहे आणि ते सत् या शब्दाने निर्देशिले जाते. अशा यज्ञकत्र्यालाही सत् असे म्हटले जाते. तसेच हे पार्थ! परब्रह्माच्या संतुष्टीप्रीत्यर्थ केल्या जाणा-या यज्ञ, तप आणि दान आदी कर्मानाही सत् असे म्हणतात.
तात्पर्य: प्रशस्ते कर्मणि अर्थात नियत कर्तव्य हे शब्द वेदांमध्ये सांगण्यात आलेल्या संस्कारांचे निर्देशक आहेत. मनुष्यावर गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंत असे संस्कार केले जातात. जीवाच्या अंतिम मोक्षप्राप्तीसाठी असे संस्कार अंगीकारले जातात. अशा सर्व संस्कारांमध्ये मनुष्याने ॐ तत् सत् या मंत्राचे उच्चारण करावे असे सांगण्यात आले आहे. सद-भावे आणि साधु-भावे हे शब्द दिव्य स्थितींचे निर्देशक आहेत. कृष्णभावनाभावित कर्म करणे यालाच सत्व असे म्हणतात आणि ज्याला कृष्णभावनाभावित कर्माचे पूर्ण ज्ञान आहे त्याला साधु असे म्हणतात. श्रीमद्भागवतात (३.२५.२५) सांगण्यात आले आहे की, भक्तांच्या संगतीत दिव्य ज्ञानाचा पूर्णपणे उलगडा होतो. या संदर्भात ‘सताम् प्रसंगात' हे शब्द योजिलेले आहेत. सत्संगाशिवाय दिव्य ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. व्यक्तीला दीक्षा देताना किंवा यज्ञोपवीत धारण करताना ॐ तत् सत् हे शब्द उच्चारले जातात. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या यज्ञांचे उद्दिष्ट ॐ तत् सतू हेच असते. ततू अर्थियमू म्हणजे परब्रह्माचे प्रतिनिधित्व करणा-या सर्व गोष्टींची सेवा करणे, उदाहरणार्थ, भगवंतांच्या मंदिरामध्ये स्वयंपाक करणे अथवा साहाय्य करणे किंवा भगवंतांच्या गुणगौरवांची गाथा प्रसारित करणे. याप्रमाणे सर्व कर्माची परिपूर्णता करण्यासाठी ॐ तत् सत् या शब्दांचा विविध प्रकारे उपयोग केला जातो.