No edit permissions for मराठी

TEXT 23

niyataṁ saṅga-rahitam
arāga-dveṣataḥ kṛtam
aphala-prepsunā karma
yat tat sāttvikam ucyate

नियतम्—नेमलेले, सङ्ग-रहितम्—आसक्तीरहित, अराग-द्वेषतः—आसक्ती व द्वेष न ठेवता, कृतम्-केले जाते; अफल-प्रेप्सुना-फलप्राप्तीची इच्छा न धरणाच्या मनुष्याकडून; कर्म-कर्म; यत्-जे; तत्-ते; सात्विकम्-सात्विक; उच्यते-म्हटले जाते.

जे कर्म नेमलेले आहे व आसक्तीशिवाय केले जाते, जे रागद्वेष न ठेवता आणि फलप्राप्तीच्या इच्छेविना केले जाते, त्या कर्माला सात्विक कर्म म्हणतात.

तात्पर्य: विभिन्न वर्ण व आश्रमांवर आधारित शास्त्रांतील नियत कर्मे, जी निष्काम भावनेने अथवा स्वामित्वाच्या अधिकाराशिवाय, राग-द्वेष भावरहित, भगवंतांना प्रसन्न करण्याकरिता व आत्मतृप्तीचा हेतून ठेवता कृष्णभावनेत केली जातात, त्यांना सात्विक कर्मे म्हणतात.

« Previous Next »