No edit permissions for मराठी
TEXT 24
yat tu kāmepsunā karma
sāhaṅkāreṇa vā punaḥ
kriyate bahulāyāsaṁ
tad rājasam udāhṛtam
यत्-जे; तु-परंतु; काम-ईष्सुना-फलाची इच्छा धरणा-या मनुष्याकडून; कर्म-कर्म;स-अहङ्कारेण-अहंकारासहित; वा-अथवा, पुनः-पुन्हा, क्रियते-केले जाते, बहुल-आयासम्-फार परिश्रमाने; तत्—ते; राजसम्—राजस; उदाहतम्—म्हटले जाते.
परंतु फलाशेची इच्छा धरणा-या मनुष्याकडून मोठ्या प्रयासाने जे कर्म केले जाते व जे मिथ्या अहंकारयुक्त बुद्धीने केले जाते, ते रजोगुणी कर्म होय.