TEXT 25
anubandhaṁ kṣayaṁ hiṁsām
anapekṣya ca pauruṣam
mohād ārabhyate karma
yat tat tāmasam ucyate
अनुबन्धम्-भविष्यातील बंधनाचे; क्षयम्-विनाश; हिंसाम्-परपीडा; अनपेक्ष्य-परिणामांचा विचार न करता; च-आणि; पौरुषम्-आपले सामथ्र्य किंवा योग्यता; मोहात्-मोहाने; आरभ्यते-आरंभिले जाते; कर्म-कर्म, यत्-जे, तत्-ते, तामसम्-तामसी; उच्यते-म्हटले जाते.
जे कर्म मोहाने, शास्त्रीय आदेशांची अवहेलना करून व भावी बंधनाची पर्वा न करता किंवा हिंसा अथवा दुस-यांना क्लेश देण्याकरिता केले जाते, त्या कर्माला तामसिक कर्म म्हणतात.
तात्पर्य: आपल्याला देशातील सरकारला किंवा भगवंतांनी नियुक्त केलेल्या दूतांना, ज्यांना यमदूत असे म्हणतात, आपल्या कर्माचा जमाखर्च दाखवावा लागतो. बेजबाबदारीने केलेले कर्मे नाशाला कारणीभूत होते, कारण त्यामुळे शास्त्रांतील नियत आदेशांचा भंग होतो. असे कर्मे प्राय: हिंसात्मक असते व ते इतर जीवांना पीडादायक होते. असे बेजबाबदार कर्म स्वत:च्याच अनुभवावर आधारून केले जाते. यालाच मोह म्हणतात. अशी सारी मोहग्रस्त कर्मे तमोगुणांमुळे उत्पन्न होतात.