No edit permissions for मराठी

TEXT 26

mukta-saṅgo ’nahaṁ-vādī
dhṛty-utsāha-samanvitaḥ
siddhy-asiddhyor nirvikāraḥ
kartā sāttvika ucyate

मुक्त-सङ्गः-सर्वं भौतिक संसर्गापासून मुक्तः अनहम्-वादी-मिथ्या अहंकाररहित; धृति-निर्धार; उत्साह-आणि उत्साह; समन्वितः-योग्यः; सिद्धि-सिद्धी; असिद्धयोः-आाणि अपयशात; निर्विकार:-निर्विकार, कर्ता-कर्ता, सात्विक:-सत्वगुणी; उच्यते-म्हटला जाती.

जो मनुष्य प्राकृतिक गुणांचा संग न करता, मिथ्या अहंकाराविना, निश्चयाने आणि उत्साहाने, यशापयशामुळे विचलित न होता आपले कर्म करतो त्याला सात्विक कर्ता असे महटले जाते.

तात्पर्य: कृष्णभावनाभावित मनुष्य नेहमी प्राकृतिक गुणांच्या पलीकडे असतो. त्याच्याकडे जे कर्म सोपविलेले आहे त्या कर्माच्या फलाची त्याला अपेक्षा नसते, कारण तो मिथ्या अहंकार व गर्व यांच्या पलीकडे गेलेला असतो. तरी देखील कार्य पूर्ण होईपर्यंत तो नेहमी उत्साही असतो. कार्य करीत असताना होणा-या क्लेशांची तो चिंता करीत नाही, तो नेहमी उत्साहपूर्णच असतो. तो यश किंवा अपयशाची पर्वा करीत नाही व सुखदुःखात समान वृत्ती बाळगतो. असा कर्ता सत्वगुणी असतो.

« Previous Next »