No edit permissions for मराठी

TEXT 28

ayuktaḥ prākṛtaḥ stabdhaḥ
śaṭho naiṣkṛtiko ’lasaḥ
viṣādī dīrgha-sūtrī ca
kartā tāmasa ucyate

अयुक्तः-शास्त्राविरुद्ध कर्म करणारा; प्राकृतः-भौतिकवादी; स्तब्धः-हट्टी; शठः-कपटी; नैष्कृतिक:-दुस-याचा अपमान करण्यात तरबेज; अलस:-आळशी; विषादी-खिन्न; दीर्घसूत्री-चालढकल करणारा; -आणि; कर्ता-कर्ता; तामस:-तमोगुणी; उच्यते-म्हटला जातो.

जो कर्ता नेहमी शास्त्राविरुद्ध कर्म करतो, जो भौतिकवादी, हट्टी, कपटी, दुस-यांचा अपमान करण्यात तरबेज असतो व जो आळशी, सदैव खिन्न आणि काम करताना चालढकल करणारा असतो, त्याला तमोगुणी कर्ता असे म्हटले जाते.

तात्पर्य: शास्त्रातील आदेशांनुसार कोणत्या प्रकारचे कर्म करावे व कोणत्या प्रकारचे कर्म करू नये हे आपल्याला समजते. जे लोक शास्त्रांच्या आदेशांची पर्वा करीत नाहीत, ते लोक जे कर्म करू नये तेच कर्म करतात आणि असे लोक सामान्यपणे भौतिकवादी असतात ते शास्त्रीय आदेशांनुसार न वागता प्रकृतीच्या गुणांनुसार कर्म करतात. असे लोक सभ्य नसतात आणि साधारणपणे सदैव कपटी व दुस-याचा अपमान करण्यात पटाईत असतात. ते अतिशय आळशी असतात, काम असूनही ते नीट न करता नंतर कधी तरी पूर्ण करण्याकरिता बाजूला सारतात. म्हणून ते खिन्न असल्याचे आढळतात. ते काम करण्यात नेहमी दिरंगाई करतात व तासाभरामध्ये होणारे काम वर्षानुवर्षे करीतच असतात. असे हे कर्ते तमोगुणी असतात.

« Previous Next »