No edit permissions for मराठी

TEXT 29

buddher bhedaṁ dhṛteś caiva
guṇatas tri-vidhaṁ śṛṇu
procyamānam aśeṣeṇa
pṛthaktvena dhanañ-jaya

बुद्धे:-बुद्धीचे; भेदम्-भेद; धृते:-स्थैर्य, निश्चय; -सुद्धा; एव-निश्चितपणे; गुणत:- प्राकृतिक गुणांद्वारे; त्रि-विधम्-तीन प्रकारचे; श्रुष्णु-ऐक; प्रोच्यमानम्-मी सांगितल्याप्रमाणे; अशेषेण-विस्ताराने किंवा तपशीलवार; पृथक्त्वेन-वेगवेगळे; धनञ्जष्य-हे धनंजय.

हे धनंजय! प्रकृतीच्या तीन गुणांनुसार होणारे बुद्धी आणि निश्चय यांचे निरनिराळ्या प्रकारचे भेद आता मी तुला तपशीलवार सांगतो ते ऐक.

तात्पर्य: आता ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता यांचे प्रकृतीच्या गुणांनुसार तीन निरनिराळ्या विभागांचे विवेचन केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण कत्र्याची बुद्धी आणि धृती (निश्चय) यांच्या भेदांचेही त्याचप्रमाणे निरूपण करीत आहेत.

« Previous Next »