No edit permissions for मराठी

TEXT 30

pravṛttiṁ ca nivṛttiṁ ca
kāryākārye bhayābhaye
bandhaṁ mokṣaṁ ca yā vetti
buddhiḥ sā pārtha sāttvikī

प्रवृक्तिम्-कृती करणे; च-सुद्धा; निवृत्तिम्-कृती न करणे; च-आणि; कार्य-कार्य किंवा करण्याजोगी कृती; अकार्ये-अकार्य किंवा न करण्याजोगी कृती; भय-भय;अभये-निर्भयपणा; बन्धम्-बंधन; मोक्षम्-मोक्ष; च-आणि;या-जो; वेक्ति-जाणतो; बुद्धिः-बुद्धी; साती; पार्थ-हे पार्थ, सात्विकी-सात्विक.

हे पार्थ! ज्या बुद्धीद्वारे मनुष्य प्रवृत्ती आणि निवृत्ती, कार्य आणि अकार्य, भय आणि निर्भय, बंधन आणि मोक्ष यांना जाणतो ती सात्विक बुद्धी होय.

तात्पर्य: शास्त्रांच्या निर्देशनानुसार जी कर्मे केली जातात त्यांना प्रवृत्ति असे म्हणतात. शास्त्रांनी निर्देशित न केलेली कर्मे करू नयेत. ज्या मनुष्याला शास्त्रांच्या निर्देशनाचे ज्ञान नाही तो कर्माच्या फळांनी व प्रतिष्फळांनी बांधला जातो. जी बुद्धी सारासार विचार करू शकते ती सात्विक बुद्धी होय.

« Previous Next »