No edit permissions for मराठी

TEXT 33

dhṛtyā yayā dhārayate
manaḥ-prāṇendriya-kriyāḥ
yogenāvyabhicāriṇyā
dhṛtiḥ sā pārtha sāttvikī

धृत्या-निश्चय, निर्धार; यया-ज्या; धारयते-मनुष्य धारण करतो; मनः-मनाचा; प्राण-प्राण; इन्द्रिय-आणि इंद्रिये; क्रियाः-क्रिया; योगेन-योगाभ्यासाद्वारे; अव्यभिचारिण्या-अखंड किंवा निरंतर; धृतिः -निर्धार किंवा निश्चय; सा-तो; पार्थ-हे पार्थ, सात्विकी-सात्विक,

हे पार्थ! जो निश्चय अचल आहे, जो योगाभ्यासाद्वारे खंबीरपणे धारण केलेला आहे आणि अशा रीतीने जो मन, प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय होय.

तात्पर्य: योग हे परमात्म्याला जाणण्याचे एक माध्यम आहे. जो मनुष्य आपले मन, प्राण व इंद्रिये यांच्या क्रिया परमात्म्यावर एकाग्र करून दृढ निश्चयाने व धैर्याने परमात्म्याच्या ठिकाणी युक्त असतो तो कृष्णभावनेमध्ये संलग्न होतो. अशा प्रकारचा निर्धार सात्विकी असतो. अव्यभिचारिण्या हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे, कारण हा शब्द दर्शवितो की, जे कृष्णभावनेमध्ये संलग्न झालेले आहेत ते अन्य प्रकारच्या कोणत्याही कार्याने विचलित होत नाहीत.

« Previous Next »