No edit permissions for मराठी

TEXT 34

yayā tu dharma-kāmārthān
dhṛtyā dhārayate ’rjuna
prasaṅgena phalākāṅkṣī
dhṛtiḥ sā pārtha rājasī

यया-ज्यामुळे; तु-परंतु धर्म-धार्मिकपणा; काम-काम, इंद्रियतृप्ती; अर्थान्-आणि अर्थ; धृत्या-निर्धाराने; धारयते-मनुष्य धारण करतो; अर्जुन-हे अर्जुन; प्रसड्रेन-आसक्तीमुळे; फलआकाङ्क्षी-फलाची आकांक्षा करणारा; धृति:-धृती, निर्धार; सा-ती; पार्थ-हे पार्थ; राजसी-राजसिक.

परंतु हे अर्जुन! ज्या निर्धाराने मनुष्य धर्म, अर्थ आणि काम यांच्या फळांना आसक्त असतो तो निश्चय राजसिक होय.

तात्पर्य: जो मनुष्य नेहमी धार्मिक किंवा आर्थिक कार्याच्या फळांची अभिलाषा करतो, इंद्रियतृप्ती हीच ज्याची एकमेव इच्छा असते आणि याच क्रियांमध्ये ज्याचे मन, प्राण आणि इंद्रिये गुंतलेली असतात तो रजोगुणी असतो.

« Previous Next »