No edit permissions for मराठी

TEXT 36

sukhaṁ tv idānīṁ tri-vidhaṁ
śṛṇu me bharatarṣabha
abhyāsād ramate yatra
duḥkhāntaṁ ca nigacchati

सुखम्-सुख; तु-परंतु; इदानीम्-आता; त्रि-विधम्-तीन प्रकारचे; श्रृंणु-ऐक; मे-माझ्याकडून; भरत-ऋषभ-हे भरतश्रेष्ठा; अभ्यासात्-अभ्यासाने; रमते-मनुष्य रमण करतो; यत्र-जेथे; दु:ख-दुःखाची; अन्तम्-अंत;-सुद्धा;निगच्छति-प्राप्त करतो.

हे भरतश्रेष्ठा! बद्ध जीव ज्या तीन प्रकारच्या सुखाचा उपभोग घेतो आणि ज्यामुळे त्याच्या दुःखांचा अंत होतो ते तीन प्रकारचे सुख आता माझ्याकडून ऐक.

तात्पर्यः बद्ध जीव हा भौतिक सुखाचा पुन:पुन्हा उपभोग घेण्याचा प्रयत्न करीत असतो. याप्रमाणे तो पुनःपुन्हा चर्वितच चर्वण करीत असतो. परंतु कधी कधी असा उपभोग घेत असताना एखाद्या महात्म्याचा सत्संग लाभल्यामुळे तो भवबंधनातून मुक्त होतो. दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, बद्ध जीव हा सदैव कोणत्या तरी प्रकारच्या इंद्रियतृप्तीत गुंतलेला असतो. जेव्हा सत्संगामुळे तो जाणतो की, त्याच त्याच गोष्टीची पुनरावृत्ती होत आहे आणि मग जेव्हा त्याची मूळ कृष्णभावना जागृत होते तेव्हा तो अशा पुनःपुन्हा प्राप्त होणा-या तथाकथित सुखापासून मुक्त होतो.

« Previous Next »