No edit permissions for मराठी

TEXT 38

viṣayendriya-saṁyogād
yat tad agre ’mṛtopamam
pariṇāme viṣam iva
tat sukhaṁ rājasaṁ smṛtam

विषय-इंद्रिय विषयांच्या; इन्द्रिय-आणि इंद्रियांच्या; संयोगात्—संयोगाने, यत्-जे, तत्-ते; अग्रे-प्रारंभी; अमृत-उपमम्-अमृतासमान; परिणामे-शेवटी; विषम् इव-विषाप्रमाणे; तत्-ते, सुखम्—सुख; राजसम्—राजसिक, स्मृतम्—मानले जाते.

इंद्रियांचा विषयांशी संयोग झाल्याने प्राप्त होणारे सुख, जे प्रारंभी अमृतासारखे भासते, परंतु शेवटी जे विषाप्रमाणे असते त्या सुखाला राजसिक सुख म्हटले जाते.

तात्पर्य: एखादा युवक जेव्हा युवतीला भेटतो तेव्हा त्याची इंद्रिये त्या युवतीला पाहण्यास, तिला स्पर्श करण्यास आणि तिच्याशी संभोग करण्यास त्याला प्रवृत्त करतात. प्रारंभी हे सर्व इंद्रियांना फार सुखदायक वाटते; परंतु शेवटी किंवा काही कालांतराने हे सर्व विषाप्रमाणेच होते, कारण ते विभक्त होतात किंवा एकमेकांपासून घटस्फोट घेतात व या गोष्टी शोक, दु:ख इत्यादी गोष्टीस कारणीभूत ठरतात. असे सुख हे नेहमी राजसिक असते. इंद्रिये आणि इंद्रियविषय यांच्या संयोगापासून प्राप्त होणारे सुख हे सदैव दुःखासच कारणीभूत ठरते म्हणून असे सुख कोणत्याही प्रकारे टाळलेच पाहिजे.

« Previous Next »