TEXT 4
niścayaṁ śṛṇu me tatra
tyāge bharata-sattama
tyāgo hi puruṣa-vyāghra
tri-vidhaḥ samprakīrtitaḥ
निश्चयम्-निर्णय, निश्चित मत; भृणु-ऐक; मे-माझे; तत्र-त्याविषयी; त्यागे-त्यागाबद्दल; भरत-सत्-तम-हे भरतश्रेष्ठ; त्यागः-त्याग; हि-खचित; पुरुष-व्याघ्र-हे नरशादूल, (पुरुषांमधील वाघ); त्रि-विधः-तीन प्रकारचा; सम्रकीर्तितः-घोषित केला जातो.
हे भरतश्रेष्ठ! आता त्यागाबद्दलचा माझा निर्णय ऐक. हे नरशार्दूल, शास्त्रामध्ये तीन प्रकारच्या त्यागांचे वर्णन केलेले आहे.
तात्पर्यः त्यागाविषयी जरी मतभेद असले तरी, येथे भगवान श्रीकृष्ण आपला जो निर्णय अभिव्यक्त करतात, तो निर्णय अंतिम समजला पाहिजे. एकंदरीत वेदशास्त्रे म्हणजे भगवंतांनी दिलेले निरनिराळे कायदे आहेत. परंतु येथे तर भगवंत स्वयं उपस्थित आहेत आणि म्हणून त्यांचा निर्णय अंतिम समजला पाहिजे. भगवान सांगतात की, भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांपैकी ज्या गुणांनुसार त्याग केला जात आहे, त्यानुसार त्यागाचा प्रकार समजला पाहिजे.